🌟परभणी जिल्हा प्रशासनाने पीएम भगवान विश्‍वकर्मा योजनेचा लाभ द्यावा.....!


🌟भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी🌟


परभणी (दि.०९ जुलै २०२४) : परभणी जिल्हा प्रशासनाने पीएम भगवान विश्‍वकर्मा योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या महानगर शाखेने जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

                 पीएम भगवान विश्‍वकर्मा योजनेंतर्गत बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार या समाजबांधवांनी जिल्ह्यातील विविध प्रशिक्षण केंद्रांवर प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणाच्या कालावधीत प्रशिक्षणार्थींना निधीसुध्दा मिळाला, परंतु साहित्य खरेदी करण्यासाठी 15 हजार रुपये किंवा साहित्य देण्यात येणार होते. प्रशिक्षण होवून पाच महिन्याचा कालावधी लोटला असूनसुध्दा प्रशासनाने अद्याप साहित्य दिले नाही, अशी खंत भारतीय जनता पार्टीच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी (दि.09) जिल्हा प्रशासना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली. या योजनेचा कालावधीच अवघ्या सहा महिन्याचा आहे. क्यूआर कोडचाही कालावधी संपत असून अजूनही कुठलीही कारवाई झालेली नाही. तसेच या योजनेत व्यवसायात 1 लाख रुपयांचे कर्जही देण्यात येणार आहे. परंतु, या संबंधी बँकांशी संपर्क केला असता आमच्याकडे कोण्याही प्रकारचा लेखी आदेश नाही, असे महाराष्ट्र ग्रामीण बँक व बँक ऑफ इंडिया यांच्या प्रशासनाने सांगितले. त्यामुळे प्रशिक्षण पूर्ण करुनही लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत, अशी खंतही या शिष्टमंडळाने व्यक्त केली.

               या शिष्टमंडळात भारतीय जनता पार्टीचे मंडळाध्यक्ष भालचंद गोरे, दिगंबर पांचाळ, गंगाप्रसाद मोरे, बळीराम गरुड, दीपक वाकीकर, माणिकराव पांचाळ, संजय हनवते, बालाजी पांचाळ, विष्णू पांचाळ, गजानन पांचाळ, रामकिशन राऊत, त्रिंबक राऊत, गजानन खटले, रमेश जांगीड, सोपान भालेराव, ज्ञानेश्‍वर पांचाळ, अविनाश पांचाळ, अभिषेक लाड, बालाजी पांचाळ, रामेश्‍वर पंडीत, महेश पांचाळ, भागवत पांचाळ, हेमंत पांचाळ, कृष्णा भाले, विष्णू राऊत, बाळू पांचाळ, शंकर जावळे, सोपान पांचाळ, बाबुराव अंजन, पांडूरंग सवणे, अशोक पांचाळ, विठ्ठल पांचाळ, गोविंद वाघमारे, मारोती सूर्यवंशी, निलेश पांचाळ आदींचा समावेश आहे.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या