🌟नांदेड येथे दि.04 ते 07 जुलै पर्यंत विविध रोगांवर फ्री मेडीकल कॅम्प व मोफत चष्मे व आय लॅन्स शस्त्रक्रीया कॅम्प.....!

🌟तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा बोर्ड व ही तेरा मिशन चंदीगढ यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प आयोजित🌟


 
नांदेड : तख्त सचखंड श्री हजूर अविचलनगर साहिब नांदेड, गुरुद्वारा बोर्ड, नांदेड व तेरा ही तेरा मिशन चंदीगढ यांच्या संयुक्त विद्यमाने फ्री मेडीकल कॅम्प दि. 6 व 7 जुलै 2024 रोजी दशमेश हॉस्पीटल, नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये स्त्री रोग, हृदय, छाती, पोट, मुत्र रोग व औषधी विशेषज्ञ यांचे फ्री मेडीकल कॅम्प सकाळी 09 ते 01 व सायं 3 ते 5 या वेळेत होणार आहेत. या कॅम्प मध्ये प्रसिध्द डॉक्टरर्स - डॉ. हरप्रीत कौर-स्त्री रोग व प्रसुती तज्ञ, डॉ. करणदीप सिंघ हृदयरोग विशेषज्ञ, डॉ. जैम जैस आहलूवालिया छाती रोग तज्ञ, डॉ. गुरसिमरन सिंघ औषधी तज्ञ, डॉ.टी.पी.सिंघ - पोट विकारां चे विशेषज्ञ,डॉ.हरप्रीत सिंघ मुत्र रोग विशेषज्ञ यांची उपस्थिती राहणार आहे.

तसेच दि. 4 ते 6 जुलै 2024 पर्यंत ऑय कॅम्पचे आयोजन सुध्दा होणार आहेत. या कॅम्पमध्ये सुप्रसिध्द नेत्र सर्जन व पुर्व पी.जी.आय. चंदीगढ डॉ. रोहित गुप्ता हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. तसेच या कॅम्पमध्ये गरजूंचे मोफत डोळ्यांचे ऑपरेशन लॉयन्स आय हॉस्पीटल, सिडको येथे मोफतहोणार आहेत यावेळी गरजुंना मोफत चष्मे सुध्दा वाटप करण्यात येणार आहेत. या कॅम्पला संपूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश गुरुद्वारा वोर्डचे प्रशासक डॉ. विजय सतविर सिंघ (पुर्व आय.ए.एस.) यांनी गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक यांना दिले व त्यांच्या सहकार्यासाठी स्टाफ सुध्दा देण्याचे निर्देश दिले आहेत......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या