🌟पंतप्रधान गतिशक्ती योजना ही देशातील मिश्रवहन जोडणी अद्ययावत करण्यासाठीची महत्वाची योजना....!


🌟परभणीत एकदिवसीय प्रधानमंत्री गतिशक्ती प्रशिक्षण संपन्न🌟


परभणी (दि.03 जुलै 2024) :- पंतप्रधान गतिशक्ती योजना ही देशातील मिश्रवहन जोडणी अद्ययावत करण्यासाठीची महत्वाची योजना असून, यामुळे देशातील पायाभूत सुविधा क्षेत्राचा विकास करण्यासाठी उपयोग होणार असल्याचे नागपूर येथील महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजना केंद्राचे वैज्ञानिक डॉ.इंदल के.रामटेके यांनी सांगितले. 

येथील शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात अधिकारी यांचेसाठी आयोजित प्रधानमंत्री गतिशक्ती एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजना केंद्राचे संचालक डॉ. अशोक कुमार जोशी, जि. आई. एस. तज्ज्ञ  डॉ. रविंद्र पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंह परदेशी, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी बी. बी. चौलवार, राजू ढोकणे संशोधन अधिकारी  सुनिल सावंत, यांच्यासह विविध विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी श्री. रामटेके म्हणाले की, देशातील पायाभूत सुविधा क्षेत्राचा विकास करण्याकरिता प्रधानमंत्री गतिशक्ती ही योजना कार्यान्वयित करण्यात आली आहे. ही योजना राबविण्यामागे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे मिश्रवहन जोडणीला चालना देणे. तसेच देशातील पुरवठा क्षेत्राचा खर्च कमी करणे असा आहे. ‘प्रधानमंत्री गतिशक्ती’ हे एक डिजिटल स्थानक असून, या अंतर्गत एकूण 16 विविध मंत्रालये, राज्ये आणि संबंधित विभागात समन्वय घडवून एकमेकांशी जोडण्यात आले आहे. उदा. रस्ते मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, जहाज वाहतूक, विमान वाहतूक इत्यादी मंत्रालये अशी जोडणी सकल नियोजन आणि पायाभूत प्रकल्पांची अंमलबजावणी याकरिता करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री गतिशक्ती या उपक्रमामुळे सर्वसामान्य जनता, वस्तू आणि सेवा यांची वाहतुकीच्या एका पद्धतीकडून दुसऱ्या पद्धतीकडे होणारी हालचाल ही सुकर करण्याकरिता एक सामायिक आणि विना अडथळा जोडणी उपलब्ध होणार आहे. पायाभूत सुविधा अगदी शेवटच्या टोकापर्यंत जोडण्याची सुविधा आणि प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेमध्येदेखील बचत होणार असल्याचे श्री. रामटेके यांनी प्रशिक्षणात मार्गदर्शन केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या