🌟विज कंत्राटी कामगारांच्या आंदोलनास तांत्रिक कामगार युनियनचा पाठिंबा....!


🌟अशी माहिती तांत्रिक कामगार युनियनचे सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी दिली🌟 

नागपूर (दि.०८ जुलै २०२४):-महावितरण,महापारेषण , महानिर्मिती कंपनी कंत्राटी कामगारांना कायम , कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगाराची हमी, वयोमर्यादेमध्ये वाढ, कल्याण  महामंडळाची स्थापना करा, कायम कामगारांप्रमाणे विमा कवच द्या, वेतनामध्ये वाढ करा, वाढीव मार्क आदी  मागण्याकरीता कृती समितीने पुकारलेल्या राज्यव्यापि आंदोलनास तांत्रिक कामगार युनियनच्या जाहिर पाठिंबा देण्यात आला आहे अशी माहिती तांत्रिक कामगार युनियनचे सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी दिली.

कंत्राटी कामगारांना कायम करा, कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगारी हमी, वयोमर्यादेमध्ये वाढ, कल्याण मंडळाची स्थापना करा, कायम कामगारांप्रमाणे विमा कवच द्या, वेतनामध्ये वाढ करा, वाढीव मार्क आदी अशा मागण्याकरीता तांत्रिक कामगार युनियनने राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन पुकारले होते. सदरहु आंदोलन 2 जुलै 2024 पासुन 04 जुलै 2024 पर्यंत आझाद मैदान मुंबई येथे पार पडले. तसेच  संघटनेची सलग्न असलेली तांत्रिक अॅप्रेंटीस, कंत्राटी कामगार असोसिएशन ने सुध्दा याच मागण्या करीता राज्यव्यापी धरणे आंदोलनातुन 2 जुलै 2024 रोजी आकोश व्यक्त केला आहे.

कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्न व मागण्या हया शासन व प्रशासनाने दिरंगाई न करता त्यांनी केलेल्या परिश्रमाचा, कोवीड काळातील सेवेचा, पत्करलेल्या हुतात्माच्या, ग्राहक सेवेचा सहानुभुतिपुर्वक विचार करून सोडविण्याकरीता अनेक वेळा आग्रही मागणी आंदोलनाच्या मार्फत केली आहे. अनेक वेळा शासन व प्रशासना समवेत चर्चा करतांना सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. असे अनेक वेळा आश्वासित केले आहे.दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्याकरीता  कंत्राटी कामगारांच्या कृती समितीने दि. 11 जुलै 2024 रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सदरहु आंदोलनास संघटनेचा जाहीर असल्याची माहिती केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे व सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी दिली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या