🌟मनमाड-मुंबई दरम्यान धावत्या पंचवटी एक्सप्रेसची कसारा घाटात अचानक कपलिंग निघाली मोठा अनर्थ टळला....!


🌟घटनेत कोणत्याही प्रकारची जिवित किंवा वित्तहानी नाही : अर्धे डब्बे पुढे तर अर्धे डब्बे मागे राहिल्याने प्रवासी भयभीत🌟

छत्रपती संभाजीनगर : मनमाड-मुंबई दरम्यान धावत्या पंचवटी एक्सप्रेस (गाडी क्र.१२११०) या प्रवासी रेल्वे गाडीची कसारा घाटात अचानक कपलिंग निघाल्याची घटना आज शनिवार दि.०६ जुलै २०२४ रोजी सकाळी ०८.३० ते ०८.५० दरम्यान घडली दरम्यान या दुर्दैवी घटनेत कोणत्याही प्रकारची जिवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून हाती आलेल्या माहितीनुसार समजते.


घटना स्थळी रेल्वे सेना टिमसह लोहमार्ग पोलीस प्रशासन तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी/अधिकारी तात्काळ हजर झालेले असून रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असून या दुरूस्ती कामासाठी अंदाजे दोन/तीन तास लागतील या घटनेमुळे दादर-हिंगोली जनशताब्दी (गाडी क्र.१२७०७१) ही प्रवासी एक्सप्रेस गाडी मुंबई येथून जवळपास दोन ते तीन तास उशिरा निघणार असल्याचे समजते पंचवटी एक्सप्रेस हा जनशताब्दी एक्सप्रेसचा लिंक रेल्वे आहे यामुळे प्राथमिक अंदाज आहे या घटनेत सर्व प्रवासी अत्यंत सुखरूप असल्याचे रेल्वे प्रवासी सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी कळवले आहे.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या