🌟विदर्भातील बलाढ्य शेतकरी नेते रविकांत तुपकर उद्या शनिवारी ठरविणार पुढील राजकीय भूमिका.....!


🌟बुलढाण्यात ०६ जुलैला शेतकरी नेते रविकांत तुपकर समर्थकांची महत्वाची बैठक ; संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचेही लक्ष लागून🌟 


✍️ मोहन चौकेकर 

बुलडाणा : शेतकरी, शेतमजूर, युवक व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी लढणारा फायर ब्रँड नेता म्हणून राज्यभर प्रसिद्ध असणारे तथा शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले शेतकरी नेते रविकांत तुपकर शनिवारी, ०६ जुलै रोजी आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. यासाठीच जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. बुलढाणा शहरातील चिखली रोडवर असलेल्या गोलांडे लॉन्स येथे ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच बैठक आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्या कार्यकर्त्यांशी प्रथमच  जाहीरपणे संवाद साधणार आहेत. त्यामुळे ते नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे शिवाय या बैठकीत शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर कोणती राजकीय भूमिका जाहीर करतात याकडे देखील जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे देखील लक्ष लागून आहे.

              बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी एकट्याच्या बळावर तब्बल अडीच लाख मते घेत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. मेहकर, सिंदखेडराजा चिखली आणि बुलढाणा या घाटावरच्या चार विधानसभा मतदारसंघाच्या बेरजेत ते पहिल्या क्रमांकावर होते मात्र घाटाखालील जळगाव जामोद आणि खामगाव या दोन मतदारसंघातून त्यांना अपेक्षित  मते न मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. पण असे असले तरी विजयी उमेदवारापेक्षा यांच्या पराभवाचीच चर्चा सर्वत्र आहे.  हा पराभव देखील खूपकाही सांगणारा आहे. तब्बल अडीच लाख मते घेणारा महाराष्ट्रातील दुसरा अपक्ष उमेदवार म्हणून शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर समोर आले असून त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. या लढवय्या नेत्याचे पुढील राजकीय भविष्य उज्वल असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळासह सामान्यजनांमध्येही सुरू झाल्या आहेत. घाटावरच्या चारही विधानसभा मतदार संघात लक्षणीय मते घेतल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकरांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या भविष्यातील राजकारणाची दिशा काय राहील याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. त्यामुळे शनिवारी होणारी  बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.या वेळी शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर हे त्यांची पुढील राजकीय भूमिका या बैठकीत स्पष्ट करणार आहेत.  शिवाय कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी ही महत्वाची बैठक बोलावली आहे. बुलडाणा शहरातील गोलांडे लॉन्स येथे ६ जुलैला सकाळी १० वाजता ही महत्वाची बैठक होणार आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी,  युवक व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या रेकॉर्डब्रेक आंदोलनामुळे रविकांत तुपकर महाराष्ट्रभरात परिचित आहेत. अपक्ष असूनही त्यांनी तब्बल अडीच लाख मते घेतली. मेहकर विधानसभा मतदारसंघात घेतलेली तोडीस तोड मते, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात मिळालेले विक्रमी  मताधिक्य आणि चिखली, बुलडाण्यातील मते पाहता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी त्यांचे नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे.  विधानसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उतरावे असा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे.  आता शेतकरी नेते रविकांत तुपकर नेमकी काय भूमिका घेतात हे मात्र आपल्याला ६ जुलैलाच कळणार आहे, त्यामुळे सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागून आहे.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या