🌟सोनपेठ पोष्ट ऑफिसचे सब पोष्ट मास्तर माने यांना निरोप तर खंदारे यांचे स्वागत....!


🌟यावेळी कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी संपादक किरण रमेश स्वामी हे होते🌟 


सोनपेठ (प्रतिनिधी) :- सोनपेठ तालुक्यातील पोष्ट ऑफिस येथे दि.8 जुलै 2024 सोमवार रोजी सब पोष्ट मास्तर डि.एम.माने यांची प्रशासकीय कारनाणे बदली ही मराठवाडा कृषी विद्यापीठ पोष्ट ऑफिस परभणी येथे बदली झाली तसेच त्यांच्या जागेवर मुंबई येथुन सब पोष्ट मास्तर अनिल खंदारे यांची नियुक्ती झाली म्हणून सब पोष्ट ऑफिस कार्यालयात छोटेखानी सब पोष्ट मास्तर डि.एम.माने यांना निरोप तर सब पोष्ट मास्तर अनिल खंदारे यांच्या स्वागताचा कार्येक्रम संपन्न झाला.


यावेळी कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन तर सत्कारमूर्ती सब पोष्ट मास्तर माने व सब पोष्ट मास्तर खंदारे हे होते, सुत्रसंचलन कमलाकर कुलकर्णी यांनी केले तर मनोगत सब पोष्ट मास्तर अनिल खंदारे, सब पोष्ट मास्तर डि.एम.माने व अध्यक्षीय समारोप संपादक किरण रमेश स्वामी यांनी केला या प्रसंगी सर्व पोष्ट ऑफिस कर्मचारी बंधु भगिनींनी मान्यवरांचे स्वागत केले संपादक किरण रमेश स्वामी यांचे स्वागत हरुन सय्यद यांनी केले, सब पोष्ट मास्तर माने यांनी खंदारे यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत केले तर माने यांना निरोपीय सत्कार कमलाकर कुलकर्णी व सर्व पोष्ट कर्मचारी यानी शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देऊन करण्यात आले, यावेळी कमलाकर कुलकर्णी पोस्ट मास्तर खडका, हरुन सय्यद पोष्ट मन सोनपेठ, संदीप जाधव पोष्ट मन सोनपेठ, दिपक उपाडे पोष्ट मन सोनपेठ, नाथराव मुंडे पोष्ट मास्तर डिघोळ, चैतन्य भेंडेकर पोष्ट मास्तर मुदगल, मिनाक्षी वेवहारे बॅग पॅकर सोनपेठ, बनाजी लांडगे पोष्ट मन लिंबा, सुधाकर गुट्टे पोष्ट मास्तर कान्हेगाव, शारेक भाई काजी पोष्ट मास्तर शेळगाव, पंकज काष्टे पोष्ट मन नावाडी, रतन पांडुळे पोष्ट मास्तर नरवाडी आदिंची उपस्थीती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या