🌟पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात किरकोळ प्रमाणात वाढ......!


🌟जलाशयात २७.६९ टक्के एवढा जिवंत पाणीसाठा शिल्लक🌟 

परभणी (दि.०६ जुलै २०२४) :  पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात हळूहळू वाढ होतांना दिसत असून या जलाशयात आजच्या स्थितीत २७.६९ टक्के एवढा जिवंत पाणीसाठा शिल्लक असल्याचे पूर्णा पाटबंधारे प्रकल्प प्रशासनाकडून समजते.

          या जलाशयात १२४.६७० दशलक्ष घनमीटर मृत तर ८०९.७७० दशलक्ष घनमीटर जीवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. या जलाशयात ९३४.४४० दशलक्ष घनमीटर एवढ्या पाणीसाठ्याची क्षमता आहे त्या तूलनेत बुधवार दि.०३ जुलै २०२४ रोजी सकाळी 8 ०८.०० वाजेपर्यंत या जलाशयात १२४.६७० दशलक्ष घनमीटर मृत, २२४.२४७ जिवंत तर ३४८.९१७ एवढा एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे जलाशयातील पाणी पातळी ४५४.२०० मीटर एवढी असून मागील २४ तासात या जलाशयात ०.२०७ दशलक्ष घनमीटर एवढी पाण्याची आवक झाली. जलाशयात २७.६९ टक्के एवढा जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे अशी माहिती पूर्णा पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या