🌟परभणीच्या सभेत सत्तारूढ पक्षास मनोज जरांगे पाटलांचा निर्वाणीचा इशारा : सकारात्मक निर्णय घ्या अन्यथा किंमत मोजा...!


🌟सत्तारूढ पक्ष १३ जुलै पर्यंत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा जरांगेंनी व्यक्त केली🌟


परभणी (दि.०७ जुलै २०२४) :- मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने दिलेल्या मुदतीत सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा  आगामी विधानसभा निवडणुकीत त्याची जबर किंमत मोजावी लागेल असा स्पष्ट इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज रविवार दि.०७ जुलै रोजी परभणीत आयोजित केलेल्या जनजागरण व गरजवंत मराठ्यांची संवाद रॅलीच्या समारोप प्रसंगी दिला.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील रॅलीचा आज रविवारी सायंकाळी समारोप झाला त्याप्रसंगी लाखोंच्या जनसमुदाया समोर जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणातून सत्तारूढ पक्ष १३ तारखेपर्यंत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जर सरकारने या प्रश्नाकडे पुन्हा कानाडोळा केला तर महायुतीच्या तिन्ही पक्षांना आगामी निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागेल निवडणुकीत २८८ उमेदवार उभे करायचे की २८८ उमेदवार पाडायचे हे ठरवावे लागेल असे असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर गैरसमज पसरवत असल्याची टिका केली त्यांची ती टीका पूर्णतः चुकीची आहे फडणवीस यांनी आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली  पाहिजेत आपण काय बोललो हे तपासले काय कृती केली हेही पाहिले पाहिजे असे ते म्हणाले. 

भारतीय जनता पार्टीतील मराठा आमदारांनी फडणवीस यांची भेट घेवून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांच्यावर दबाव आणून आरक्षणाचा प्रश्न त्यांच्याकडून सोडून घेतला पाहिजे असे मत व्यक्त करतेवेळी जरांगे  पाटील यांनी महायुतीतील शिवसेना असो राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टीतील मराठा आमदारांनी आता निर्णायक, ठोस भूमिका घेतल्या पाहिजे, सरकारवर प्रचंड दबाव आणून ताकदीने निर्णय घ्यावयास भाग पाडले पाहिजे, सकल मराठा समाजाच्या बाजूने खुलेपणाने उभे राहिले पाहिजे, या निवडणुकीपूर्वी आरक्षणासह अन्य नऊ मागण्या पदरात पाडून घेतल्या पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.जर महायुतीतील मराठा आमदारांनी याबाबत कुचराई केल्यास त्या सर्व आमदारांनाही निवडणुकीत सर्वसामान्य मराठा समाज निश्चितच जागा दाखवून देईल असाही इशाराही जरांगे यांनी दिला. 

आरक्षणाच्या प्रश्नावर आपण सातत्याने लढत आहोत,शेवटच्या श्वासापर्यंत लढू, परंतु सर्वसामान्य मराठा समाजास आरक्षण मिळवून देऊच असा विश्वास व्यक्त करतेवेळी जरांगे यांनी या लढाईत काही जण पैसा, आमिषे किंवा दबावापोटी  अडथळे आणू इच्छित आहेत. आपल्या ताटात जेवणारे सुद्धा विष काढून इच्छित आहेत, परंतु त्या बेईमान  मंडळीची फारशी दखल घेण्याची गरज नाही, 

सर्वसामान्य मराठा समाजाच्या कल्याणाकरिता आरक्षण हे नितांत गरजेचे आहे, त्याशिवाय मराठा समाजातील लेकरा बाळांच्या भविष्याचा प्रश्न सुटणार नाही,मराठा समाजाने सुद्धा आरक्षणाचा विषयाचे गांभीर्य ओळखावे व या चळवळीत आपले अमुल्य असे योगदान द्यावे. निर्णय होईपर्यंत  जिद्दीने, चिवटपणे लढा द्यावा,चळवळ बळकट करण्याकरीता सर्वार्थाने प्रयत्न करावेत.आपापसातील मतभेद दूर ठेवावेत. या विषयात  आपण एकोप्याने  उभे राहिलो  तरच हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत आपण दाखवलेल्या ताकतीमुळेच सत्तारूढ पक्षास काही गोष्टी कळून चुकल्या आहेत, त्यामुळे या मुद्द्यावर ते निश्चितच सकारात्मक असतील, दुर्दैवाने त्यातूनही काहीही बोध न घेतल्यास सत्तारूढ पक्षास संपूर्ण महाराष्ट्रातून सकल मराठा समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल असेही जरांगे यांनी म्हटले. मराठा समाजाच्या या आंदोलनास अनेक मंडळींनी फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ही चळवळ सकल मराठा समाजाच्या भक्कम पाठिंबा ने दिवसेंदिवस ताकदवान होत आहे असे नमूद करीत जरांगे यांनी आपण एकाकी नाहीत, आपल्याबरोबर लाखो करोडोंचा मराठा समाज पाठीशी उभा आहे, त्यामुळेच निर्णय लढाई अधिक तीव्र करीत यशस्वी केली जाईल असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला. मराठा समाजाच्या बांधवांनी या पेटलेल्या संघर्षात आता मागे हटू नये आपल्यावर होणाऱ्या टीका टिपणीकडे फारसे लक्ष देऊ नये,कोणी आपणास जातीयवादी म्हणत आहे, लढ्यासहित जातीवादी लढा ठरवत आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत समाज बांधवांनी आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्याच्या दृष्टीने आगामी काळात भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन केले. 

जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणातून छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार टीका टिपणी केली. भुजबळ यांनी बेताल वक्तव्य बंद करावीत असा इशारा दिला.आगामी विधानसभा निवडणुकीत भुजबळ यांच्यासह जो कोणी ओबीसी नेता लोकप्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलेल त्या विरोधात सकल मराठा समाज भक्कमपणे विरोधासाठी उभा राहील असाही इशारा  दिला 

महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या पक्षातील मराठा आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार या तिघांवर मोठा दबाव आणावा व मराठा आरक्षणाचा मुद्दा पूर्णतः निकाली काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या