🌟परभणी जिल्हा महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने शनिवार दि.१३ जुलै रोजी नाभिक समाजातील गुणवंतांचा गौरव....!


🌟जिंतूर रस्त्यावरील विसावा कॉर्नर जवळील सखा गार्डनच्या सभागृहात सकाळी ११.०० वाजता गौरव सोहळ्याचे आयोजन🌟 

परभणी (दि.११ जुलै २०२४) :  नाभिक समाजातील इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा शाखेतर्फे शनिवार दि.१३ जुलै २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातून गौरव करण्यात येणार आहे.

              जिंतूर रस्त्यावरील विसावा कॉर्नर जवळील सखा गार्डनच्या सभागृहात सकाळी ११.०० वाजता आयोजित केलेल्या या कार्यक्रमास माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे हे अध्यक्षस्थानी तर नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे, शिक्षणाधिकारी संजय ससाणे हे प्रमुख पाहुणे म्हणून, तर अभियांत्रिकी महाविद्यालय सल्लागार समितीचे संचालक महेश पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या व्यतिरिक्त महामंडळाचे सरचिटणीस पांडुरंग भंवर, युवक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र कावरे, महामंडळाचे विभागीय अध्यक्ष युवराज शिंदे, उपाध्यक्ष कृष्णा कंठाळे, संघटक बालासाहेब पारवे आदी उपस्थित राहणार आहेत.

             या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हाध्यक्ष संपत सवणे यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या