🌟पीक विमा भरताना केंद्रचालकाने एक रुपयापेक्षा जास्तीचे पैसे आकारल्यास परवाना होणार रद्द.....!


🌟तक्रार नोंद ०२२-४१४५८१९३३, ०२२-४१४५८१९३४🌟 

🌟निशुल्क क्रमांक १४४११, १८००१८००४१७, व्हाट्सॲप ९०८२९२१९४८ करा तक्रार🌟

परभणी (दि.03 जुलै 2024): परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी करताना केंद्र चालकांकडून (कॉमन सर्व्हिस सेंटर) जास्त दराने किंवा किंवा एक रुपयापेक्षा अधिक पैशाची मागणी केल्यास अशा सीएससी केंद्रचालकांच्या केंद्राचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी कळविले आहे.  

अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हा दक्षता समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उपस्थित केलेल्या तक्रारीनुसार कार्यवाही करण्यात येणार असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याबाबतची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.  

             प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2024 पासून पिकांसाठी ‘सर्वसमावेशक पिक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून https://pmfby.gov.in या संकेतस्थळावर स्वःत किंवा केंद्र चालकामार्फत विमा भरण्यासाठी नोंदणी करता येईल. त्यामुळे सीएससी केंद्र चालकांना पीक विमा योजनेत नोंदणी करण्यासाठी विमा कंपनीमार्फत कमीशन देण्यात येते. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील काही केंद्र चालक शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे केंद्र चालकांनी शेतकऱ्याकडून केवळ 1 रुपया भरून पीक विमा नोंदणी करावी.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा अर्ज  भरताना शेतकऱ्यांनी १ रुपया प्रति अर्ज याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही शुल्क सीएससी केंद्रामध्ये भरू नयेत. शेतकऱ्यांकडून १ रुपयापेक्षा जास्त शुल्काची  मागणी केल्यास शेतकऱ्यांनी  निशुल्क क्रमांक १४४११, १८००१८००४१७, तक्रार नोंद ०२२-४१४५८१९३३, ०२२-४१४५८१९३४, व्हाट्सॲप ९०८२९२१९४८ या क्रमांकावर आणि  support@csc.gov.in या ईमेल आयडीवर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 शेतकऱ्याकडून अतिरिक्त पैसे घेतल्याबाबत निर्दशनास आल्यास अथवा तक्रार प्राप्त झाल्यास सरकार सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या