🌟पुर्णा तालुक्यातील माखनी येथे कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सत्कार......!


🌟या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी अनिल गवळी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती🌟 


पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील माखनी येथे कृषी दिनानिमित्त कृषी विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने काल सोमवार दि.०१ जुलै २०२४ रोजी स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने फळ रोपवाटिकेत शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी अनिल गवळी तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आत्मा प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, माहिती तंत्रज्ञानचे डॉ. गजानन गडदे, डॉ. किटक शास्त्रज्ञ डी.डी. पटाईत, उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे, कृषी विकास अधिकारी दीपक सामाले, कृषिभूषण कांतराव देशमुख, पत्रकार माणिक रासवे, श्रीकांत देशमुख, जनार्दन आवरगंड, शिवाजी शिराळे, मुरुंबा येथील प्रगतशील महिला शेतकरी मुक्ता झाडे, पंडित थोरात, गुलाब शिंदे, दिनेश दुधाटे, प्रदीप कदम, कृषी अधिकारी हे सर्व आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. 

कार्यक्रमांमध्ये प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी जनार्धन आवरगंड, ओमकार शिंदे, कांतराव देशमुख या सर्वांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आत्माच्या सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक स्वाती घोडके यांनी केले. प्रस्ताविक दीपक सामाले यांनी तर आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी वैâलास गायकवाड यांनी केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या