🌟परभणी तालुक्यातील जरी येथे ७०० लेबर कार्ड धारकांना संसार उपयोगी भांड्यांसह वृक्षांचेही वाटप.....!


🌟परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल पाटील यांचा पुढाकार🌟 

परभणी (दि.०८ जुलै २०२४) : परभणी तालुक्यातील झरी येथे दिवंगत माजी सरपंच गजाननराव देशमुख यांच्या कार्य प्रेरणेतून तसेच परभणी विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ.राहुल पाटील यांच्या पुढाकारातून ७०० लेबर कार्ड धारकांना दि.०६ जुलै २०२४ रोजी संसार उपयोगी भांडे व वृक्ष वाटप करण्यात आले.

              गरजू लेबर कार्ड धारकांची २८ आणि २९ जून रोजी नोंदणी करण्यात आली होती. नोंदणी केलेल्या झरी, साडेगाव, मिर्जापुर, पिंपळा, साटला, समसापूर, धारणगाव, मांगणगाव, दमई वाडी,हिंगला, मांडवा, जलालपुर येथील ७०० कुटुंबांना संसार उपयोगी भांडे व वृक्ष वाटपाचा कार्यक्रम झरी येथील सांस्कृतिक सभागृहात शनिवार ०६ जुलै २०२४ रोजी पार पडला यावेळी आ.डॉ.राहुल पाटील यांची उपस्थिती होती.

             यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले, गजाननराव देशमुख यांनी या भागात मोठे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचा वसा आपण पुढे चालू ठेवून झरी व पंचक्रोशीतील नागरिकांना गजानन देशमुख यांची कमी कधीच भासू देणार नाही. त्यांच्या प्रेरणेतून आपण कार्य सुरू ठेवू. झरी सर्कलसहित संपूर्ण विधानसभा मतदार संघात विविध विकास कामे असो अथवा तळागाळातील जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा मिळेल या करिता आपण दिवस रात्र जनतेसोबत आहेत, असे आश्‍वासन दिले.

             यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले, अरविंद देशमुख, रामराव डोंगरे, संदीप झाडे, रामकिशन मुळे,तानाजी भोसले, गोपीनाथ झाडे, बंडू नाना बिडकर, सुनील देशमुख, डिके इनामदार, गजानन हेंडगे ,अशोक चोरमले, सुदाम सोनवणे, लिंबाजी अंभोरे, दत्ता जगाडे, असेफ कुरेशी, ब्रम्हानंद सावंत, किरण देशमुख, आबा चौधरी, सत्तार कुरेशी, बाळासाहेब देशमुख, नारायण गवळी, संतोष देशमुख, दर्शन बावरी, विशाल देशमुख, संदीप टेकाळे, संतोष जाधव, अशोक जाधव, वामन जाधव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना झरी शाखेने केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रल्हाद देवडे तर आभार प्रदर्शन सुरेश देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शक्ती सावंत, आनंद पंडित, संभाजी रगडे, योगेश शिरडकर, परमानंद करंजकर, गोविंद जगाडे, शंकर शेंडगे, अंकुश शिंदे, सतीश पावडे, पप्पू सोनवणे, ऋषिकेष लबडे व स्व.गजाननराव देशमुख मित्र मंडळाने परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या