🌟बोधिसत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार व्रतस्थ पने जगणार आदर्श व्यक्तिमत्व प्रकाश कांबळे....!


🌟मराठवाड्यातील एक अभ्यासू निडर निर्भीड वक्ता म्हणून त्यांनी स्वकर्तृत्वाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे🌟

सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत भारतीय संविधान गौरव  सोहळ्याचे महाराष्ट्रातील अर्धयु  पॅंथर चळवळीतील अग्रणी री.पा.ई.चे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रकाश कांबळे यांचा दहा जुलै हा वाढदिवस त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्याकडून मोठ्या उत्साहात विविध समाज उपयोगी उपक्रमामार्फत प्रबोधन कार्यक्रम घेऊन संकल्प दिन म्हणून साजरा होत आहे आंबेडकरी व धम्म चळवळीची वैभवशाली परंपरा लाभलेल्या कुटुंबा मधून ते आले आहेत. 

वडील दिवंगत श्रद्धेय बन्सी कांबळे पूर्णा शहरांमध्ये आंबेडकरी व धम्म चळवळीमध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे व संस्कारक्षम आदर्श धम्म उपासिका यांनी आपल्या सर्व सुपुत्रावर व सु कन्यावर चारित्र्य नीतिमत्ता सदाचाराची धडे दिली . सर्वांना उच्च शिक्षित केले. आंबेडकरी व धम्म चळवळीचे बाळकडू पाजले. त्यांचे सुपुत्र प्रकाश कांबळे अगदी विद्यार्थी दशे मध्ये भारतीय दलित पॅंथर चळवळीमध्ये त्यांनी स्वयं स्फूर्तीने उडी घेतली. शिक्षणासोबत दर्जेदार शिक्षणासोबत पॅंथर चळवळीला त्यांनी वाहून घेतले. एम ए हिंदी प्रावीण्य श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरअनेक उच्च पदस्थ  नोकरीच्या उपलब्ध असताना नोकरीच्या पाठीमागं न लागता पॅंथर चळवळीमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले. 

मराठवाडा विद्यापीठाला बोधी सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळावे म्हणून जो रणसंग्राम उभा राहिला त्यामध्ये मराठवाड्याचे समर्थ नेतृत्व केले.एक अभ्यासू निडर निर्भीड वक्ता म्हणून मराठवाड्यामधून मधून पुढे आले पूर्णा नगरपालिकेमध्ये भारतीय दलित पॅंथरचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आनुन नगरपालिकेची सत्ता काबीज केली नगर पालिकेमध्ये व इतर शासकीय विभागामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना त्यांनी नोकरीस लावले समाजाच्या विविध ज्वलंत समस्येबाबत शासन दरबारी आवाज उठउन संनदशिर मार्गाने लढा देऊ अनेक प्रश्न सोडवले बुद्ध विहारासमोरील झालेल्या जिल्हा परिषदेच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाबाबत कायदेशीर लढा देऊन ही जागा शाबूत ठेवली असे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. 

अखिल भारतीय भिख्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महस्थविर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली श्रद्धा भावनेने धम्म चळवळीमध्ये त्यांनी वाहून घेतले आहे गेल्या पंचवीस वर्षापासून पूर्णा शहरामध्ये भारतीय संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन करून संविधान संस्कृती रुजवण्याचा ते प्रयत्न करत आहे......आज त्यांचा जन्मदिन या मंगल प्रसंगी त्यांना आयु आरोग्य बल वैभव धनसंपदा प्राप्त हो वो ही मनोकामना मंगलमय शुभेच्छा....!

शुभेच्छुक 

श्रीकांत हिवाळे सर 

माजी तालुकाध्यक्ष 

भारतीय बौद्ध महासभा पूर्णा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या