🌟पंढरपूरसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना प्रहार जनशक्ती पक्षाकडून वैद्यकीय तपासणी व प्रथमोपचार.....!


🌟यावेळी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची निशुल्क आरोग्य तपासणी करून त्यांना औषध देण्यात आली🌟


परभणी - आषाढी वारीसाठी हिंगोली जिल्ह्यातील पिंपळदरी येथील देवमाय संस्थांच्या वारीतील वारकऱ्यांचा मुक्काम खानापूर फाटा येथे असतो मुक्कामात असलेल्या वारकऱ्यांची मुक्कामाची व जेवणाची सोय या भागातील नागरिकांच्या वतीने दरवर्षी केली जाते खानापूर फाटा येथील आनंद प्राथमिक शाळेत मुक्कामी असलेल्या १०० च्या वर वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व त्यांच्यावर प्रथमोपचार प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने करण्यात आले. मागील दोन वर्षापासून प्रहार जनशक्ती पक्ष परभणी या वारीतील वारकऱ्यांची आरोग्य सेवा करीत आहे.

यावेळी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची निशुल्क आरोग्य तपासणी करून त्यांना औषध देण्यात आली. यासाठी परभणी शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नोडल ऑफिसर डॉ. रोहिणी व्यंकटेश घोरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. मृण्मयी मोरे व डॉ. प्रणिता जुकटे, डॉ. श्र्वेतली मुंजे, डॉ.सचिन ढगे, प्रियांका टाकरसे, श्रीमती मंजुषा डामरे, श्रीमती वर्षा श्रीमंगले, प्रकाश तपासे, रघुनाथ गायकवाड, अंकिता घुनघव, गणेश सौलख, मिर फजल आली, नरेंद्र जगताप, देविदास धापसे आदींनी आरोग्य सेवा पुरवली.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, शहर प्रमुख अंकुश गिरी, रामेश्वर पुरी, बालाजी मगर, अनिल जाधव, विष्णू घोडके, श्रीधर वालेकर, रामभाऊ गिरी, वैभव पवार, निलेश शेळके, विष्णू लहाने, ज्ञानेश्वर गिरी,रामा गरूड आदींनी आरोग्य सेवेत सहभाग नोंदवला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या