🌟वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हा दक्षिण अध्यक्षपदी सुनील मगरे यांची निवड ....!


 🌟संस्थापक अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या शिफारसीनुसार प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी केली निवड🌟

परभणी (दि.०८ जुलै २०२४) :- परभणी जिल्ह्यातील पुर्णा येथील भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आणि संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये समता सैनिक दल स्थापन करण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे सुनील मगरे यांची निवड वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हा दक्षिणच्या अध्यक्षपदी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आदरणीय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या शिफारसीनुसार वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी केली आहे तशा प्रकारच पत्र त्यांना प्रदेश कार्यालयाकडून प्राप्त झाल आहे.

जिल्हा कार्यकारणी मध्ये उपाध्यक्षपदी सर्जेराव पंडित,गोविंद भेणे , कल्याण मस्के महासचिव पदी दिलीप मोरे,कैलास पवार सचिव पदी रवी वाघमारे एडवोकेट हिरानंद गायकवाड अनिल राठोड, रामकिशन डुकरे, ज्ञानेश्वर तायडे संघटक पदी शुद्धोधन सावंत, विकास साळवे, उत्तम आसले, कृष्णा सावंत, प्रदीप उजगरे यांची निवड करण्यात आली आहे सुनील मगरे आणि त्यांच्या कार्यकारणीच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा  वर्षाव होत आहे.

परभणी जिल्हा दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीचे गाव तिथे शाखा समाजातील सर्व जाती धर्माचे बांधव भगिनी यांच्यापर्यंत वंचित बहुजन आघाडीचा विचार पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे करून येत्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचा त्याने संकल्प केला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या