🌟वसंतराव नाईक यांच्यामुळेच महाराष्ट्रात हरित क्रांती झाली - प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार


🌟स्वा.सै.सूर्यभानजी पवार महाविद्यालयात वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले🌟

पूर्णा (दि.०१ जुलै २०२४) - महाराष्ट्राचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यामुळेच महाराष्ट्रात  हरित क्रांती झाली असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.रामेश्वर‌ पवार यांनी केले .ते येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलत होते.

महाराष्ट्रात सतत अन्नधान्याचा तुटवडा असे तर दुष्काळात सर्वसामान्य लोकांची उपासमार प्रचंड प्रमाणात होत असे ती उपासमार आज महाराष्ट्रात जे मुबलक अन्नधान्य मिळत आहे ते वसंतराव नाईक यांच्या हरित क्रांतीच्या धोरणांमुळे थांबली असेही त्यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा डॉ भीमराव मानकरे यांनी केले.

याप्रसंगी महाविद्यालयातील गृहविज्ञान विभाग प्रमुख तथा व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा डॉ सुरेखा भोसले, अधिसभा सदस्य प्रा.डॉ.विजय भोपाळे, क्रीडा संचालक डॉ भारत चापके, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ पी.डी.सूर्यवंशी, प्रसिद्ध विभाग समन्वयक प्रा.डॉ.संजय कसाब महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे समन्वयक प्रा.डॉ.प्रकाश सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा.डॉ.अशोक कोलंबीकर यांनी मानले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या