🌟पुर्णेतील भदंत उपाली थेरोनगर येथील जेष्ठ धम्म उपासिका विजयाताई संभाजी गायकवाड यांचे दुःखद निधन....!


🌟जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर संभाजी गायकवाड यांच्या त्या पत्नी होत्या🌟

पुर्णा (दि.०१ जुलै २०२४) - पुर्णा शहरातील भदंत उपाली थेरोनगर येथील ज्येष्ठ धम्म उपासिका रोहिणी धम्म सेवाभावी महिला मंडळाच्या अध्यक्षा विजयाताई संभाजी गायकवाड यांचे दीर्घ आजाराने उपचारादरम्यान नांदेड येथे सिविल हॉस्पिटल मध्ये आज सोमवार दि.०१ जुलै २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता दुःखद निधन झाले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर संभाजी गायकवाड यांच्या त्या पत्नी होत्या.

त्यांचा अंत्यविधी आज ०१ जुलै रोजी सायंकाळी ०५.०० वाजता बौद्ध स्मशान भूमी पूर्णा या ठिकाणी पार पडणार आहे त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर भदंत उपाली थेरोनगर येथून निघणार आहे. 

त्यांच्या दुःखद निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली विनम्र अभिवादन...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या