🌟छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिनाचे 8 जुलै रोजी आयोजन....!


🌟असे विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे🌟

परभणी (दि 02 जुलै 2024) :- विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे जुलै महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी 8 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे तसेच नियमित विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय माहिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 तक्रार करण्यासाठीचे अर्ज विहित मुदतीत नमुना प्रप्रत्र-1 (क) मध्ये दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवक शाखा प्रमुख (नायब तहसीलदार) यांच्याकडे स्विकारण्यात येणार आहेत. विहित नमुना अर्ज प्रप्रत्र-1 (क) आवक शाखेत उपलब्ध करून देण्यात आला आहे.  विभागीय महिला लोकशाही दिनासाठी पिडीत महिलांनी विहीत नमुन्यातील मुदत पुर्व अर्ज विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास, खोकडपुरा औरंगाबाद तथा सदस्य सचिव यांच्याकडे सादर करावेत. अर्जाच्या दोन प्रती विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी विभागीय आयुक्त यांच्याकडे समक्ष पुन्हा सादर कराव्यात. तसेच ज्यांनी यापुर्वीच्या विभागीय स्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेले असतील परंतू त्यांचे प्रकरणात अद्याप कार्यवाही झाली नाही, अशा प्रकरणात त्यांना पुन्हा अर्ज देता येणार नाही.

जिल्हास्तरावरील लोकशाही दिन कार्यक्रमात ज्या प्रश्नांची सोडवणूक होवू शकली नाही किंवा या प्रश्नाबाबत जिल्हास्तरीय लोकशाही दिनांत तक्रारदाराचे समाधान झाले नाही असे सर्व प्रश्न विभागीय स्तरावरील लोकशाही दिनामध्ये घेण्यात येणार आहेत, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या