🌟परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पिककर्ज वाटपाचे यंदा 2253 कोटीचे उद्दिष्ट....!🌟असे जिल्हा अग्रणी बँकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे🌟


परभणी (दि.04 जुलै 2024) : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2024-25 या वर्षासाठी नाबार्डने तयार केलेल्या संभाव्य लिंक योजनेवर आधारित ॲन्युअल क्रेडिट प्लॅन अंमलबजावणीसाठी 25 जून रोजी घोषित केला आहे. या प्लॅनच्या अंमलबजावणीमध्ये पीक कर्जाचे उद्दिष्ट 2129 कोटी (2023-24)वरून 2253 कोटीपर्यंत (2024-25 साठी उद्दिष्ट) वाढविण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या उद्दिष्टापेक्षा 124 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 5033 कोटी रुपयांची योजना असून, त्यामध्ये केवळ प्राधान्य क्षेत्रासाठी कर्जाचा समावेश करण्यात आला आहे. तथापि, एकूण योजना 2024-25 साठी अंदाजे आहे ज्यामध्ये कृषी वित्त आणि संबंधित क्रियाकलाप, बिगरशेती क्षेत्र, गृहनिर्माण कर्ज आणि शैक्षणिक कर्ज आणि इतर समावेश आहे. 2024-25 ची अंदाजे 6396 कोटी रुपये आहे.

नाबार्डने तयार केलेल्या संभाव्य लिंक योजनेवर आधारित अॅन्युअल क्रेडिट प्लॅन अंमलबजावणीचे प्रमुख वैशिष्ट्य पीक कर्जाचे उद्दिष्ट 2129 कोटी (2023-24 चे उद्दिष्ट) वरून 2253 कोटी रुपयांपर्यंत (2024-25 साठी उद्दिष्ट) वाढले आहे. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा 124 कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्याचा अंनुअल क्रेडिट प्लॅन डीसीसी बैठकीमध्ये जिल्ह्याधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला.

2024-25 या वर्षासाठीच्या अंनुअल क्रेडिट प्लॅनचे उद्दिष्ट  हे कोटीमध्ये असून, पीक कर्ज 2253, कृषी आणि संलग्न क्रियाकलाप (फलोत्पादन, दुग्धव्यवसाय आदि)साठी 1527, एकूण शेती कर्ज 3780, एमएसएमई आणि इतर प्राधान्य कर्ज 1253, एकूण प्राधान्य क्षेत्र कर्ज 5033, प्राधान्य नसलेले क्षेत्र कर्ज 1363, ॲन्युअल क्रेडिट प्लॅन 6396 कोटी रुपयांचा असून, गेल्या वर्षीच्या उद्दिष्टात 2.50 टक्के वाढ करण्यात आली असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्या अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे...... 

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या