🌟ग्रामपंचायत निवडणूक 2022 : जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास सदस्यत्व रद्द...!


🌟परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले निर्देश🌟 


परभणी (दि.05 जुलै 2024) :- राज्यात सन 2021 आणि 2022 मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या व अद्यारपही जातवैधता प्रमाणपत्र दाखल न केलेल्या सदस्यांनी 10 जुलै, 2024 पर्यंत त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र संबंधीत तहसील कार्यालयात दाखल करावे. अन्यथा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 चे कलम 10-1अ नुसार त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होऊन ते सदस्य पदावरुन अनर्ह ठरण्यास पात्र ठरतील, असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे माहे जानेवारी, 2021 मध्ये परभणी जिल्ह्यातील 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. तसेच माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2022 मध्ये प्रत्येकी 3 व माहे डिसेंबर 2022 मध्ये 127 अशा एकूण 699 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया पार पडली आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 चे कलम 10-1 अ नुसार ग्रामपंचायत निवडणूक लढविताना नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवाराने जातीचे वैधता प्रमाणपत्र दाखल केले नसेल अशा उमेदवारास निवडून आल्याच्या दिनांकापासून 12 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे. अन्यथा अशा सदस्याची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द ठरते जानेवारी, 2021 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झालेल्या 566 ग्रामपंचायतींमधील राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांना शासन परिपत्रक दिनांक 10 मे, 2022 अन्वये जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी 17 जानेवारी, 2023 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती. तसेच माहे जानेवारी, 2021 मधील निवडणुकीसह त्यानंतर झालेल्या सर्व सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या व त्यानंतर 12 महिन्याचे आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या सदस्यांना सन 2023 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 6 दिनांक 10 जुलै, 2023 अन्वये अध्यादेशाच्या दिनांकापासून 12 महिन्याचे आत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आलेली असून ही मुदत दिनांक 10 जुलै, 2024 रोजी संपणार आहे..... 

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या