🌟भारतीय टपाल कार्यालयात 16 जुलै रोजी विमा सल्लागारांच्या मुलाखती.....!


🌟इच्छुक व पात्र उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन🌟

परभणी (दि.04 जुलै 2024) :- परभणी जिल्ह्यातील भारतीय टपाल विभागाकडून डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा योजनेअंतर्गत ‘डायरेक्ट एजंट’ (विमा सल्लागार) च्या भरतीकरिता डाकघर अधीक्षक कार्यालयामध्ये मंगळवार दि.16 जुलै रोजी मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून, इच्छुक व पात्र उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागासाठी हे विमा सल्लागार नेमण्यात येणार असून, त्यासाठी मुलाखतीच्या दिवशी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असावे. अर्जदार हा इयत्ता दहावी किंवा समक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा बेरोजगार किंवा स्वयंरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्राम प्रधान, ग्राम पंचायत सदस्य ई. टपाल जीवन विमासाठी थेट अर्ज करू शकतात.  उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार असून, व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विमाबाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती इत्यादी बाबींची माहिती असणे अपेक्षित आहेत. निवड झालेल्या उमेदवारास  5 हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. ती रक्कम एनएससी किंवा केव्हीपी स्वरूपात असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. तो आयआरडीएची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरुपात रूपांतरित केला जाईल. ही परीक्षा 3 वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि कमिशन तत्वावर राहील.

सर्व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून मंगळवार, दि.16 जुलै रोजी कार्यालयीन वेळेत (०९:३० ते १८:००) अधीक्षक डाकघर, परभणी विभाग, परभणी-४३१४०१ येथे थेट मुलाखतीसाठी हजर राहावे व सोबत बायोडाटा, मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्र/अनुभव प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक असल्याचे डाकघर अधीक्षक यांनी कळविले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या