🌟परभणी शहरासह तालुक्यातील नागरिकांनी शासकीय योजनांच्या लाभासाठी 15 दिवसांत कागदपत्रे सादर करा....!


🌟परभणीचे तहसीलदार डॉ.संदीप राजपुरे यांनी केले आवाहन🌟 

 परभणी (दि.08 जुलै 2024): तालुक्यातील परभणी शहर व ग्रामीण भागातील विशेष सहाय योजनेअंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी पुढील 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी केले आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना-श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, या सर्व लाभार्थ्यांची परिपूर्ण माहिती डी. बी.टी. पोर्टलवर भरुन द्यावी. या सर्व लाभार्थ्यांना  योजनांच्या अनुदानाचा लाभ देण्यासाठी शासनाकडून सर्व लाभार्थी यांची माहिती डी.बी.टी. पोर्टलवर भरण्यासंदर्भात कळविले आहे

 तरी संबंधित लाभार्थ्यांनी त्यांचे खाते असलेल्या बँक मॅनेजरकडे संजय गांधी निराधार अनुदान योजना-श्रावणबाळ,  सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनांचा लाभ घेणा-या लाभार्थ्यांनी आपल्या बँकेच्या मॅनेजरकडे आधारकार्ड, बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रती, अद्ययावत मोबाईल क्रमांक, आर.सी. नंबर, दारिद्र्यरेषा प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अपंगाचे प्रमाणपत्र, विधवा महिलांसाठी पती मृत्यू दाखला, आजाराचे प्रमाणपत्र, लाभ मंजुरीचे आदेश नोटीस इ. कागदपत्रे सादर करावेत. सर्व कागदपत्रे सादर करण्यासाठी लाभार्थ्यांना पंधरा दिवसाचा कालावधी देण्यात आला या कालावधीत सर्व शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे सादर करणे आवश्यक असल्याचे आवाहन तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी केले आहे.....

******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या