🌟परभणी जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासी शाळेत 14 जुलैपर्यंत प्रवेश सुरु....!


🌟असे आवाहन सहायक संचालक श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे🌟

परभणी (दि.08 जुलै 2024) : परभणी जिल्ह्यात सन 2021-22 पासून महाराष्ट्र शासनाकडून धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने परभणी जिल्ह्यातील इच्छुक भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षसाठी इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी 14 जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.  

या शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास भोजन, आरोग्य, शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश इ. सुविधा शासनाकडून मोफत पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी या योजनेचा लाभ घेवू इच्छिणारा विद्यार्थी धनगर समाजातील असावा. विद्यार्थ्यांच्या पालकाने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम प्राधिका-यांने दिलेल्या धनगर समाजाच्या दाखल्याची सांक्षाकित प्रत सादर करावी. विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लक्ष इतकी असावी. सन 2024-25या वर्षात विद्यार्थी पहिली ते 5 वी या इयत्तेत प्रवेशित असावा.

परभणी जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विदयार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता निवड झालेल्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येईल. सन 2024-25 करिता शेरा प्रवेश देण्यात येणा-या विद्यार्थ्यांची संख्या ही हिरकणी सीबीएसई स्कूल, सर्व नं 203, पालम रोड, चोरवड, ता. पालम, व्हिजन इंग्लीश स्कूल, विटा रोड, सोनपेठ, कै. मानसिंग नाईक इंग्रजी प्राथमीक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुन्सीराम तांडा (सायखेडा) ता. सोनपेठ आणि जिजामाता पब्लिक स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, सोनपेठ, हायटेक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, एरंडेश्वर झिरो फाटा, ता. पुर्णा, जि. परभणी येथील शाळांमध्ये प्रत्येकी 50 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच गोल्डन ग्लोब इंग्लीश स्कूल, कोद्री रोड, गंगाखेड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, केंद्रीय विद्यालय सीबीएससी, पुर्णा ता. पुर्णा जि. परभणी प्रत्येकी 100 विद्यार्थीक्षमता आहे. 

प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांचे अर्ज 14 जुलै 2024 पर्यंत (सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत) सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण, परभणी यांच्या नावे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, कारेगाव रोड, परभणी येथे प्रत्यक्ष कार्यालयात सादर करण्याचे आवाहन सहायक संचालक श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.....

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या