🌟नांदेड येथील सचखंड गुरुद्वाराची बदनामीस कारणीभूत ठरणाऱ्या आजमखान याचे कडून किरायाची रक्कम वसूल करा....!


🌟सामाजिक कार्यकर्ते जगदीपसिंघ नंबरदार यांनी गुरुद्वारा प्रशासक डॉ.विजय सतबीरसिंघ यांच्याकडे केली मागणी🌟


 
नांदेड /प्रतिनिधी-  उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाच्या ग्राऊंडवर भव्य प्रदर्शन व उत्सव मेल्याचे आयोजन करण्यात आले होते . या मेळाव्याचे आयोजक आजमखान याने कराराप्रमाणे ठरलेली किरायाची रक्कम न देता पलायन केले असल्याने त्याचा शोध घेऊन गुरुद्वाराची थकीत रक्कम वसूल करण्याची मागणी जगदीपसिंघ नंबरदार यांनी गुरुद्वारा प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंघ यांच्याकडे केली आहे.


एप्रिल ते जून 2024 दरम्यान नांदेड येथील हिंगोली गेट गुरुद्वारा मैदानावर एक्झिबिशन व उत्सव मेल्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता छत्रपती संभाजीनगरयेथील आयोजक आजमखान यांच्यासोबत 40 दिवसाच्या करार करण्यात आला होता. कराराप्रमाणे ठरलेली रक्कम अदा न करताच आजमखान याने पलायन केले आहे. थकीत किरायाच्या वसुलीसाठी गुरुद्वारा बोर्डाच्या सुरक्षा विभागाने गार्ड तैनात करून तेथे असलेल्या दुकानदारांचे समान थांबवून ठेवले आहे.

      दुकानदार त्रस्त असल्यायाने बाबतच उलट सुलट बातम्या प्रसारित होत असल्याने गुरुद्वारा बोर्डाची बदनामी होत आहे. त्यामुळे उत्सव मेल्याचे आयोजक आजमखान याचा शोध घेऊन त्याचेकडून किरायाची थकीत असलेली 25 लाखाची रक्कम वसूल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते जगदीपसिंघ नंबरदार यांनी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंघ यांच्याकडे केली आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या