🌟परभणी जिल्ह्यात ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ स्थापन करण्याचे आवाहन.....!


🌟पायाभूत सुविधांचा वापर करून पदवीतील अभ्यासक्रमाशी निगडीत कौशल्य प्रशिक्षण प्रदान करून देण्यात येणार🌟 

परभणी (दि.11 जुन 2024) : परभणी जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. कौशल्य विकास केंद्राद्वारे 15 से 45 वयोगटातील युवक- युवतींना आपल्या महाविद्यालयातील पायाभूत सुविधांचा वापर करून पदवीतील अभ्यासक्रमाशी निगडीत कौशल्य प्रशिक्षण प्रदान करून देण्यात येणार आहे.  

त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त महाविद्यालयांनी कौशल्य प्रशिक्षण देवू इच्छिणाऱ्या महाविद्यालयांना प्रती विद्यार्थ्यामागे तासिकेनुसार शासनाकडून शुल्क अदा करण्यात येणार आहे. यासाठी महाविद्यालयांना https://forms.gle/kUz1W7bFEFyq26bc7   ही लिंक गुगलवर उपलब्ध करून दिलेली आहे. या गुगल लिंकद्वारे गुगल फार्ममधील आवश्यक ती माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयाकडे कार्यालयीन वेळेत 02452-220074 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे...... 

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या