🌟वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात लाखो रुपयांची अवैद्य दारू जप्त......!


🌟कारंजा ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई : 1 लाख 59 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त🌟 

फुलचंद भगत

वाशिम:-वाशिम जिल्ह्यात सध्या अवैध धंदे आणी दारुचा महापुर वाहतांना दिसतो.पोलिसांनीही आता अवैध धंदेवाल्याचे मुसके आवळणे सुरु केले आहे.कारंजा ग्रामीण पोलिसांनी दिनांक 26 जून रोजी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या पिंपरी मोकळ येथे अवैध दारूवर छापा टाकून एका व्यक्तीसह एक लाख 59 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

               सुञाकडुन मिळालेल्या माहीतीनुसार सविस्तर असे की, वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे , पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण खंडाळे सहायक पोलीस उपनिरीक्षक धनराज पवार पोलीस कॉन्स्टेबल दीपक यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी सकाळी साडेसात वाजता ग्राम मोकड पिंपरी येथे निळ्या रंगाची अल्टो कार क्रमांक एम एच 14 बीसी 51 28 ही गाडी संशयित वाटल्याने त्या गाडीची तपासणी केली असता वाहन चालक रमेश जयराम गिरी राहणार कारंजा यांच्या ताब्यातील अल्टो कार मध्ये देशी व विदेशी दारूच्या एकूण वीस पेट्या बॉटल ने भरलेल्या एकूण 69 हजार 320 रुपये व अल्टो कार ची किंमत नव्वद हजार रुपये असा एकूण एक लाख 59 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल वाहक चालक यांच्या ताब्यातून जप्त केला व दारू मुद्देमाल वाहन चालकासह पोलीस स्टेशन ग्रामीणला आणून त्या विचारपूस केली असता त्यांनी तो कारंजा येथील एसी वाईन शॉप मधून विकत घेऊन वाईन शॉप चे मालक अनिल चंदवानी यांच्या सांगण्यावरून विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले त्यावरून देशी विदेशी दुकानाचे मालक यांच्याकडील परवाना कागदपत्राची पाहणी करून त्यांच्याविरुद्ध व वाहन चालक रमेश गिरी यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. नेमकी एसी वाईन शॉप चे मालक अनिल चंदवाणी यांच्यावर काय कारवाई होईल?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या