🌟ज्येष्ठ पत्रकार मदन (बापू) कोल्हे यांची क्ल्यू इंटेलिजन्स डिटेक्टीव्ह डिपार्टमेंट (सीआयडीडी)चे कार्यकारी सदस्यपदी नियुक्ती.....!


🌟 त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे 🌟

परभणी  - येथील सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रांमध्ये संपूर्ण जीवन व्यतीत करत असलेले , इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार मदन(बापू) कोल्हे , संपादक धर्मभूमी यांची केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाचे विविध उपक्रम समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवुन समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देणाऱ्या ' क्ल्यू इंटेलिजन्स डिटेक्टिव्ह डिपार्टमेंट '( सुराग खुफीया जासुस विभाग) च्या कार्यकारी सदस्य पदी नियुक्ती झाली आहे देशातील सद्य स्थितीत आर्थिक गुन्हेगारीला , भ्रष्टाचाराला आळा घालणे त्याचबरोबर महिलांवरील वाढते अत्याचार, अन्यायग्रस्त,पिडीत ,शोषितांना न्याय मिळवून देणे, तरुणाईला विविध व्यसनांच्या विळख्यातुन बाहेर काढणे,अशा अनेक गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी या पदाचा उपयोग होणार आहे.

मदन (बापू) कोल्हे यांनी गुरुवर्य ' पत्रकार महर्षी ' कै.दे.ग. उर्फ' काकासाहेब ' रसाळ व डॉ.रवींद्र रसाळ यांच्या सहवासात नांदेड च्या दै.गोदातीर समाचार द्वारे पत्रकारितेची सुरुवात करून ,गेल्या 53 वर्षापासून पत्रकारिता व समाजसेवेत नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत.विद्यार्थी जीवनापासून समाजसेवेचे व्रत हाती घेऊन निस्वार्थपणे विविध क्षेत्रातील संघटनात्मक कार्यावर भर देत , वयाचा अमृत महोत्सव पार करूनही संघर्षमय जीवन जगत, सायकलवर भ्रमण करत , मदन (बापू) कोल्हे समाजाच्या हितासाठी, पत्रकारितेच्या माध्यमातून कार्यरत आहेत, त्यांच्या कार्याची दखल घेऊन वेळोवेळी अनेक नामवंत संस्था, संघटनांनी त्यांना 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण ,जीवन गौरव , मुकनायक,आदर्श पत्रकार ,संपादक रत्न ,आदी विविध पुरस्कार, सन्मानपत्र व मानपत्र देऊन गौरवलेले आहे .

वरील सी.आय.डी.डी.च्या कार्यकारी सदस्य पदावरील नियुक्तीमुळे मदन(बापूं)च्या कार्याचा सन्मान झाला आहे. सदरील नियुक्ती बद्दल सी.आय.डी.डी.चे महाराष्ट्र व कर्नाटक विभाग प्रमुख संजय कुमार कोटेचा व महिला संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य प्रमुख श्रीदेवी पाटील यांचे मदन (बापू)कोल्हे यांनी आभार माणून त्यांना धन्यवाद व्यक्त केले आहेत.मदन (बापू)कोल्हे यांच्या या नियुक्तीमुळे त्यांच्या जीवनभरातील सायकलवर भ्रमण करीत असलेल्या कार्याचा निश्चितच गौरव झाला असल्याची भावना सायकल  दिना( 3 जून ) निमित्त व्यक्त करण्यात येत असून मित्र परिवारातर्फे त्यांचे अभिनंदन केले जात आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या