🌟नांदेड जिल्ह्यातील भोकर जवळ दगडाची चुरी घेऊन भरधाव वेगात जाणाऱ्या हायवा ट्रकने दिली दूचाकीस जोरदार धडक.....!


🌟भिषण अपघातात दूचाकीवरील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू🌟

नांदेड/भोकर(प्रतिनिधी) - दगडाची चुरी घेऊन भरधाव वेगात जाणाऱ्या हायवा ट्रकने दूचाकीस धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात दूचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ३१ रोजी सायंकाळी सहा वाजता बाह्य वळण रस्त्यावर घडली.भोकर चा बाह्यवळण रस्ता म्हैसा नांदेड असा आहे उमरी कडे जाताना बाह्यवळण चौकातून जावे लागते                                                                        रस्ता झाल्यापासून येथे यापूर्वी अनेक अपघात होऊन आपले प्राण गमवावे लागले.दि ३१ मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास या उमरी बायपास वर अजय कन्स्ट्रक्शन, नांदेड या बांधकाम कंपनीचा हायवा ट्रक एम एच २६ बि ई ९९०७  हा गिट्टीचा चुरा घेऊन भोकर शहराकडे येत होता.याच वेळी भोकर वरुन उमरीकडे मोटारसायकल वर पल्म्बर म्हणून काम करणारे हरिदास बालाजी साडेवार वय ३० रा.शास्त्रीनगर व इलेक्ट्रिशियनचे काम करणारा राहुल दत्ता वाघमारे वय वय ३२ रा.भिमटेकडी, भोकर हे तरुण कामा निमीत मोटारसायकल वरुन क्र.एम एच २६ सिजे ५४९३ उमरीकडे जात होते.बाह्यवळण चौकात येताच हायवा ट्रकच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला अन सदर ट्रकने मोटारसायकला जोराची धडक देऊन दोन तरुणांना उडविले.या भाषण अपघातात राहुल वाघमारे हा ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने जागीच मरण पावला तर दुसरा हरिदास सांडेवार हा दुचाकी सोबत फरफटत गेला.यात तो गंभीर जखमी झाला होता.यावेळी येथे उपस्थित नागरीक त्यास रुग्णालयात नेत असतानाच तो मृत पावला.घटना घडल्यानंतर हायवा ट्रक चालक गाडी सोडून पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कानगुले व जोंधळे अधिक तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या