🌟पुर्णा तालुक्यातील माटेगावात अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास....!


🌟त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुले,आई वडील,भाऊ,असा परिवार आहे🌟

पुर्णा :- पुर्णा तालूक्यातील माटेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी नागेश सोपान बोबडे (वय वर्ष ३५) याने वैफल्यग्रस्त होवून काल मंगळवार दि.१८ जून २०२४ रोजी रात्री ११.०० ते १२.०० वाजेदरम्यान स्वतःच्या राहत्या घरी टिन पत्राच्या लोखंडी आडूच्या अँगलला गळफास घेवून आपली जिवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली.

सदर माहिती मयताचा भाऊ बालाजी बोबडे यानी दिली त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई वडील, भाऊ, असा परिवार आहे. गावात एकाच आठवड्यात दोन आत्महत्याच्या घटना घडल्यामुळे माटेगाव व सभोवताली परिसरात एकच खळबळ उडून हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट दिली, या प्रकरणी पुढील तपास पूर्णा पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या