🌟केद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर ; अमित शहा पुन्हा गृहमंत्री, नितीन गडकरी रस्ते व वाहतूकमंत्री....!

 🌟मुरलीधर मोहोळांकडे अमित शाहांच्या सहकार खात्याचे व नागरी उड्डाणखात्याचे राज्यमंत्रीपद🌟 

🌟प्रतापराव जाधव आयुष कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री,रक्षा खडसे यांची क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्रीपदी नियुक्ती🌟


 ✍️ मोहन चौकेकर

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.10) रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर  केंद्रीय मंत्रीमंडळातील  खात्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. एनडीएच्या सरकारमध्ये 72 खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती.

* नितीन गडकरी, अमित शाह, एस जयशंकर आणि राजनाथ सिंह यांचे खाते कायम ठेवण्यात आले आहे. नितीन गडकरी यांना पुन्हा त्यांचे रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एस जयशंकर यांना परराष्ट्र,राजनाथ सिंह यांना संरक्षण आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वेमंत्रालय मिळाले आहे.

*महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणती खाती मिळाली ते जाणुन घेऊ या :-

*नितीन गडकरी - रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय*

*पियुष गोयल -  वाणिज्य मंत्रालय*

*रक्षा खडसे  - क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री*

*मुरलीधर मोहोळ - सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री*

*रामदास आठवले - सामाजिक न्याय राज्यमंत्री*

*प्रतापराव जाधव  -  आयुष,कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री ( स्वतंत्र कार्यभार )

*महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते. दोघांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची हॅटट्रिक केली आहे.नितीन गडकरी यावेळी नागपूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर पियुष गोयल उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य पियुष गोयल यांना मिळाले होते. दरम्यान, आता त्यांची पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद नियुक्ती करण्यात आली आहे.*

*पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणते खाते /मंत्रालय मिळालंय ते जाणुन घेऊ या :-

अमित शाह - गृहमंत्रालय

राजनाथ सिंह - संरक्षण मंत्रालय

एस जयशंकर - परराष्ट्र

*नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक*

निर्मला सीतारमन - अर्थमंत्रालय

शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय

जतीन राम - सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय 

पियुष गोयल -वाणिज्य

अन्नपूर्णा देवी - महिला आणि बाल विकास मंत्रालय

भूपेंदर यादव - पर्यावरण

राम मोहन नायडू - नागरी उड्डाण मंत्रालय

जेपी नड्डा - आरोग्य मंत्रालय

सर्वानंद सोनोवाल - पोर्ट शिपिंग मंत्रालय

सी आर पाटील - जलशक्ती

किरण रिजीजू - संसदीय कार्यमंत्री 

धर्मेंद्र प्रधान - शिक्षण मंत्री

* राज्यमंत्री :-

श्रीपाद नाईक- गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री

शोभा करंदाजे - राज्यमंत्री - सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय

शांतनु ठाकुर - पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्री 

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या