🌟परभणी जिल्ह्यात प्रीपेड विद्युत स्मार्ट मीटर सक्तीने लावण्यास आम आदमी पार्टीचा तिव्र विरोध....!


🌟व्यवस्थापकीय संचालक महावितरण महाराष्ट्र यांना आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आले निवेदन🌟


परभणी :- परभणी जिल्ह्यात प्रीपेड विद्युत स्मार्ट मीटर सक्तीने लावण्यास विरोध दर्शवण्यासाठी परभणी जिल्हा आम आदमी पार्टी तर्फे परभणी जिल्हा अधीक्षक अभियंता महावितरण यांच्यामार्फत व्यवस्थापकीय संचालक महावितरण महाराष्ट्र यांना निवेदन देण्यात आले. 

जिल्ह्यात बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर खरेदी करणे व बसविण्याचा खर्च प्रति मीटर 6500 रुपये असताना  अदानी, मॉनटेकारलो आणि एनसीसी कंपनीं मार्फत 12000 रुपये दराने खर्च देण्यात आलाय. हा  जो दुप्पट खर्च आकारलेला आहे तो विज ग्राहकांवरती आर्थिक भुर्दंड म्हणून वाढीव बिलामार्फत वसूल केला जाऊ शकतो आणि या भांडवलदार कंपन्यांच्या माध्यमातून बीजेपी सरकार करोडो चा चंदा प्राप्त करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  वीज कायदा 2003 मधील कलम 55 नुसार वीज ग्राहकांना अशा प्रकारची सक्ती करता येत नाही.तरीही या कंपन्यांचं भलं करण्यासाठी वीज ग्राहकांना या स्मार्ट मीटरची सक्ती करण्यात येत आहे. हे स्मार्ट मीटर बसवण्याची अंमलबजावणी जर थांबली नाही तर वीज ग्राहकांच्या हितासाठी आम आदमी पार्टी राज्यभर रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला. यावेळी परभणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर महासचिव अनिल देशमुख मंगेश खंदारे माऊली झाडे योगेश देशमुख रणजीत भोसले अभिषेक पंडित उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या