🌟पुर्णा तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील रोजमजूरांच्या तोंडचा घास पळवण्याचा गंभीर प्रकार...!


🌟ग्रामरोजगार सेवकाने जॉब कार्डवर स्वतःचाच खाते क्रमांक टाकून परस्पर हडपली रोजमजूराची हक्काची मजूरी🌟

पुर्णा (वृत्त विशेष - चौधरी दिनेश) - जिल्हा परिषद/पंचायत समिती अंतर्गत शेतकरी/शेतमजूर/रोजमजूरांच्या हितासाठी शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र रोजगार हमी योजना,महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसह राज्य व केंद्र शासनाच्या योजना भ्रष्ट अधिकारी/कर्मचारी आणि बेईमान लोकप्रतिनिधीच्या संगनमतातून कागदोपत्रीच राबविण्यात येत असल्याचे निदर्शनास येत असून अनेक शासकीय योजनांमध्ये कोट्यावधी रुपयांची अफरातफर झाल्यामुळे या जनहीतवादी योजना संबंधित लोकांसाठी अक्षरशः कुबेराचा भंडार ठरत आहेत.

परभणी जिल्ह्यातील पुर्णा पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील अनेक गावांत महाराष्ट्र रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत मातोश्री पांदन रस्ते, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना,जलजिवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना,गावपातळीवरील सिमेंट रस्ते/नाली बांधकाम,सिंचन विहीर आदी कामातून रोजमजूरांच्या हाताला काम मिळावे या शुध्द हेतूने सदरील कामे ग्रामरोजगार सेवकांच्या नियंत्रणाखाली रोजमजूरांकडून केली जातात परंतु भ्रष्ट अधिकारी/ग्रामविकास अधिकारी/ग्रामरोजगार सेवक यांच्यासह सरपंच/उपसरपंच यांच्या संगनमताने या कामांमध्ये कोट्यावधी रुपयांचे घोटाळे तर होतांना दिसतच आहेत त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या कामांवर नियंत्रण ठेवणारे ग्रामरोजगार सेवक देखील आपले हात ओले करुन घेतांना पाहावयास मिळत असून असाच गंभीर प्रकार तालुक्यातील गौर गावात घडल्याचे नुकतेच उघडकीस आले असून गौर येथील ग्रामरोजगार सेवक मारोती पारवे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत आर्थिक गैरव्यवहार करीत चक्क रोजमजूरांच्या तोंडचा घास पळवून धनलक्ष्मीदास झाल्याचा प्रकार त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रार अर्जावरून समोर आला असून त्यांनी डब्ल्यूएलपी-बिडीओ गौर ज्ञानेश्वर सिताराम जोगदंड यांचे सिताफळ वैयक्तिक फळबाग लागवड कामाचा सांकेतांक : १८१७००८०४८/आयएफ/१२३५३९९३२० या कामाच्या मस्टरवर काम करणारे ज्ञानदेव सिताराम जोगदंड यांच्या जॉब कार्डवर चक्क स्वतःचे खाते क्रमांक टाकून प्रत्येकी १५३६/-रुपयें याप्रमाणे सहा (मस्टर क्रमांक ७४४०,८९०९,१०६४९,१३७२७,१७५८७,१९१३६) मसटरवरील मजूरी स्वतःच्या वैयक्तिक खात्यात वर्ग करुन अपहार केला व त्याची मजूरी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी उपयोगात आणली सदरील जॉब कार्डवर अद्यापही ही त्यांचे स्वतःचे खाते क्रमांक जोडलेले असल्यानचे पाहावयास मिळत असून सदरील ग्रामरोजगार सेवक मारोती पारवे यांनी रोजमजूरांच्या ममजूरीवरच नव्हे तर फळबाग योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांचे मस्टर काढण्याच्या नावावर शेतकऱ्यांकडून स्वतःसह स्वतःच्या कुटुंबासाठी सदस्यांच्या खात्यावर देखील पैसे घेतल्याचे लाभार्थी शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे गौर गावात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनांतर्गत शंभर फाईल मंजूरी तसेच जवळपास दोनशे सिंचन विहिरी,शंभर सव्वाशे घरकूल तसेच शंभर सव्वाशे घरकूलांची देखील काम झाली असून जलजिवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे जवळपास पावणे दोन कोटी रुपयांचे कामाला सुरुवात झाली होती सदरील कामे शासकीय नियमानुसार कागदोपत्री रोजमजूरांकडून करण्यात आल्याचे दाखवण्यात आले असेल तर मग संबंधित कामांच्या मस्टरवर दाखवलेल्या रोजमजूरांपर्यंत रोज मजूरी पोहोचली असेल की ती मजूरी ग्रामरोजगार सेवक मारोती पारवे यांनी परस्पर स्वतःचा खाते क्रमांक टाकून पळवली याची देखील चौकशी होणे आवश्यक आहे.

ग्रामरोजगार सेवक मारोती पारवे यांच्या विरोधात गौर येथील भगवान जोगदंड व शरद जोगदंड यांनी दि.०९ मे २०२४ रोजी पुराव्यानिशी लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे तक्रार दिली असून तक्रार देऊन महिन्याच्यावर कालावधी उलटल्यानंतर देखील संबंधित ग्रामरोजगार सेवक मारोती पारवे यांच्यावर कारवाई होत नसल्याने संबंधित वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालण्याचा गंभीर प्रकार तर करीत नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या