🌟परभणी येथील परभणी-वसमत रोडवरील पाटील नगरातील लिट्ल चॅम्पियन इंग्लिश स्कूल मध्ये वृक्षारोपण.....!


🌟या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग आबा शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 


परभणी :- परभणी येथील परभणी-वसमत रोडवरील पाटील नगर येथील लिट्ल चॅम्पियन इंग्लिश स्कूल परभणी येथे वृक्षारोपण करण्यात आले. माध्यमिक विद्यालय काळे धानोरा येथील चंद्रकांत गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाटील नगर मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. 

त्यानिमित्त या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग आबा शिंदे, सोपानराव शिंदे, भगवानराव शिंदे , शाम गाडेकर,राजेंद्र गाडेकर, तुळशीराम दळवे, सुधाकर कदम, संजय कदम,अनिल ढगे, अमोल कामतीकर,नितीन शिंदे, श्रीकृष्ण वानखेडे,आदी उपस्थित होते. याप्रसंगी खानापूर येथील स्मशान भूमी मध्ये सुद्धा वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये कडुलिंब , वड ,पिंपळ, सप्तपर्णी  अशी वेगवेगळी झाडे लावण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या