🌟परभणी तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे यांनी केले प्रशिक्षणाचे उत्कृष्ट नियोजन.....!


🌟जिल्ह्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचा विषय होता महिला गृह उद्योग व नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख कार्यक्रम संपन्न🌟


परभणी :- कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत जिल्ह्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन प्रकल्प संचालक आत्मा परभणी, दौलत चव्हाण,उप प्रकल्प संचालक आत्मा संजय गायकवाड, तसेच तालुका कृषी अधिकारी परभणी, नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती घोडके सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी, यांनी शेतकरी महिलांची गरज लक्षात घेऊन महिलांना गृह उद्योग चांगल्या प्रकारे कसा करता येईल आणि महिलांचे कष्ट कसे कमी करता येतील आणि त्यातून अन्नप्रक्रिया करून  महिलांना जास्त नफा कसा मिळवून देता येईल, याबाबत अभिमानास्पद अतिशय उत्कृष्टपणे जिल्ह्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षणाच्या आयोजन केले,या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.इंद्रमणी कुलगुरू,डॉ.उदय खोडके संचालक विस्तार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी,अध्यक्षस्थानी प्रकल्प संचालक आत्मा परभणी, दौलत चव्हाण,प्रमुख उपस्थिती उप प्रकल्प संचालक आत्मा परभणी,संजय गायकवाड कार्यक्रमाचे आयोजक तालुका कृषी अधिकारी परभणी, नित्यानंद काळे, मार्गदर्शक डॉ.जी.यु. शिंदे, डॉ. बी.एस.आगरकर  असोसिएट प्रोफेसर,वनामक्रवी परभणी, श्रद्धा मुळे रिसर्च असोसिएट, रमेश इक्कर, प्रमोद रेंगे ओंकार विष्णू वीर, कलमेश मोहन पाटील हे सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित होते, जिल्ह्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचा विषय होता महिला गृह उद्योग व नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख,या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा तीस पर्यंत केले होते, या मध्ये भाजीपाला सुखवण्याच्या यंत्राचे प्रात्यक्षिक, चकली मशीन प्रात्यक्षिक, कलम करण्याचे आधुनिक तंत्र प्रात्यक्षिक रोबोट द्वारे, कोल्ड स्टोरेज, कांदा चाळ, ड्रोन प्रात्यक्षिक, हे सर्व आयोजित केले होते,स्वागतासाठी स्वाती घोडके यांनी नवीन संकल्पना साकारली झाडे लावा झाडे जगवा असे आपण फक्त इतरांना सांगतो पण आपण स्वतः याची सुरुवात केल्याशिवाय काहीच होणार नाही या दृष्टिकोनातून सर्व मान्यवरांचा केशर आंब्याचे रोप देऊन स्वागत करण्यात आले, डॉ. इंद्रा मणी आणि डॉ. उदय खोडके यांनी सर्व शेतकरी बांधवांना अतिशय उत्कृष्टपणे ऑनलाइन हजर राहून मार्गदर्शन केले, स्वाती घोडके यांची महिलांसाठी असणारी धडपड लक्षात घेऊन कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले आहे असे बोलून स्वाती घोडके यांना प्रोत्साहन दिले आणि  आत्मा आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यामाने असेच कार्यक्रम होतील असे आश्वासन दिले, दौलत चव्हाण यांनी महिला महिला गृह उद्योग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले,संजय गायकवाड यांनीही शेतकऱ्यांना गृह उद्योग विषयी सविस्तर मार्गदर्शन केले, नित्यानंद काळे यांनी कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती दिली, डॉ. जी.यु.शिंदे यांनी नवीन तंत्रज्ञानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, डॉ.बी.एस. आगरकर यांनी भाजीपाला सुखवण्याच्या यंत्राविषयी आणि त्याचे फायदे जास्त मिळणारा नफा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.जी.यु. शिंदे तर उत्कृष्ट सूत्रसंचालन स्वाती घोडके यांनी केले,कार्यक्रम यशस्वीरित्यासाठी पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी जनार्दन बालासाहेब आवरगंड, रामेश्वर साबळे, विशाल जावळे, विजय जंगले, मुक्ता झाडे,वर्षा चोपडे,अनुसया झाडे यांनी मदत केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या