🌟वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील महिलांनी वृक्षारोपन करुन वृक्षाचे महत्व पटवुन दिले...!


🌟शेलुबाजार येथील संस्कार गुरुदेव मंडळातील महिलांचा कौतुकास्पद उपक्रम🌟 

फुलचंद भगत

वाशिम :- वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा होत असलेला र्‍हास लक्षात घेता वृक्षारोपण होणे खुप गरजेचे आहे हे सर्वांना कळावे व वृक्षारोपनासोबतच वृंक्षसंवर्धनही व्हावे यासाठी शेलुबाजार येथील संस्कार गुरुदेव मंडळातील महिलांनी वृक्षारोपन करुन वृक्षाचे महत्व पटवुन दिले.

             मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील संस्कार गुरूदेव महीला मंडळातील सदस्य महिला यांनी पर्यावरणाचा समतोल रहावा व निसर्ग मित्र बनुन वृक्षारोपण हाती घेतले व त्याची सुरुवात ही पहिल्या पावसाच्या आगमनाने केली.शेलुबाजार येथील स्थानिक गजानन महाराज संस्थान शेलुबाजार परिसरात शंभर वृक्षलागवडीचे ऊदिष्ट हाती घेत संस्कार गुरूदेव महीला मंडळातील प्रत्येक महिलेला एक झाड लावण्याचा संकल्प करत याची सुरूवात दिनांक १० जुन पासुन करण्यात आली. यावेळी योगा प्रशिक्षक लहान मुले व मुली यांनी रोपवन केलेल्या वृक्षाची सामुहिक पुजा प्रार्थना करून आराधना केली यावेळी संस्कार गुरूदेव महीला मंडळातील दुर्गा दुगाणे, शालीनी वानखेडे, वैशाली माकोडे, बेबी क्षिरसागर,प्रिती साळवे, शोभा इंगोले,पुजा हरणे, सविता घोडे, शिल्पा हिवराळे, लता येवले, भावना बोबडे,पद्मीनी कावळे, सुनंदा लांभाडे,शैला सोळंके,मंदा लांभाडे, सह योगा प्रशिक्षक,शिक्षक राजपूत डांगे, व गजानन महाराज संस्थान विश्वस्त हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या