🌟वाशिम येथे लाचलुचपतप्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई....!


🌟 जिल्हा ऊपनिबंधक ६ लाख रुपयांची लाच स्विकारतांना अडकला एसिबीच्या जाळ्यात🌟

🌟वाशीमचा क्लास वन अधिकारी ६ लाखेची लाच स्वीकारताना चतुर्भुज🌟


फुलचंद भगत

वाशिम :- वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस लाच मागणीचे मोठमोठे प्रकरण ऊजागर होत आहेत.काल झालेल्या लाचलुचपत विभागाच्या कारवाईत थोडी नव्हे तर तब्बल नऊ लाख ऊपयांची लाच मागीतल्याचे प्रकरण समोर आले असुन त्यापैकी सहा लाख रुपये घेतांना वाशिम येथील वर्ग-१ च्या जिल्हा ऊपनिबंधकास एसिबी पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. प्राथमिक चौकशीचा (कसुरी अहवाल)  अहवाल तक्रारदार यांची बाजूने अनुकूल पाठवण्यासाठी  दिग्विजय राठोड, (जिल्हा उपनिबंधक वर्ग १,  सहकारी संस्था वाशिम,) यांनी ९,००,००० रुपये लाचेची मागणी केली होती. त्यातील उर्वरित ६ लाख रुपयाची लाच स्वीकारताना अकोला एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. ही घटना ६ जून रोजी संध्याकाळी ९ वाजताच्या सुमारास तिरुपती सिटी वाशिम येथे घडली. 

मंगरूळपिर येथील तक्रारदार यांचे विरूध्द सुरू असलेल्या प्राथमिक चौकशीचा (कसुरी अहवाल)  अहवाल तक्रारदार यांची बाजूने अनुकूल पाठवण्यासाठी  दिग्विजय राठोड, (जिल्हा उपनिबंधक वर्ग १,  सहकारी संस्था वाशिम,) यांनी ९,००,००० रुपये लाचेची मागणी केली होती. दरम्यान तक्रारदार याने त्यामधील २ लाख ५०,००० रुपये अगोदरच पहिली किस्त म्हणून दिले होते.ऊर्वरित रहलेले ६ लाख ५०,००० रुपयांच्या  लाचेसाठी राठोड याने तक्रारदार कडे  तकादा लावला होता.  उर्वरित रकमेची मागणी करत असल्याबाबत तक्रारदार यांनी दि. ४ जून २०२४ रोजी अकोला येथील अँटी करप्शन ब्युरो येथे तक्रार दिली.   नमूद तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक ६ जून २०२४ रोजी पडताळणी कारवाई केली . यावेळी आरोपी राठोड यांनी तडजोडीअंती तक्रारदारास ६ लाख रुपये लाच रक्कम मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून ६ जून रोजी  सायंकाळी  तिरुपती सिटी (वाशिम) येथील सिल्व्हर अपार्टमेंट मध्ये त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी  सापळा रचला असता त्यावेळी  राठोड यांनी तक्रारदार कडून ऊर्वरित असलेली ६ लाख रुपये रोख रक्कम स्वीकारली. लगेच राठोड याला रोख रक्कम ६ लाख रुपयांसह ताब्यात  घेऊन भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम  १९८८ अन्वये वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.  

सदरची कारवाई अकोला एसीबी पथकातील पोलिस निरीक्षक सचिन सावंत, यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार, पोलिस अंमलदार दिगंबर जाधव, अभय बावस्कर, संदीप ताले, निलेश शेगोकार  यांनी यशस्वीरीत्या पार पाडली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या