🌟मुलीच्या लग्नासाठी पाच हजाराची मुलीच्या आई,वडीलास आर्थिक मदत.....!

              


 🌟एक हात मदतीचा : बालासाहेब जगतकर यांचा कौतुकास्पद सामाजिक उपक्रम🌟 

परळी - मुलीच्या लग्नासाठी मुलीच्या आई वडीलास पाच हजाराची आर्थिक मदत करण्यात येत असल्याची माहिती तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र चे संपादक बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या वर्षभरापासून परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने परळी शहरातील भीम नगर साठे नगर रमा नगर व प्रबुद्ध नगर या विभागातील मुलीच्या लग्नास परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने एक हात मदतीचा म्हणून मुलीच्या लग्नासाठी मुलीच्या आई-वडीलास पाच हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून भीम नगर मधील ऑटो चालक सिद्धू सोपान कांबळे यांच्या मुलीच्या लग्नात पाच हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली असून यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर कल्याण ताटे कपिल ताटे विशाल कांबळे व आदी कार्यकर्ते दिसत आहेत तर जास्तीत जास्त मुलीच्या आई-वडिलांनी संपर्क साधून तक्षशिला सेवाभावी संस्थेची एक हात मदतीचा या उपक्रमाचा लाभ घ्यावा असेही आव्हान तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक व वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या