🌟छत्रपती संभाजी नगरात पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची शिवसैनिक घेणार शाळा....!


🌟विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार आंदोलन🌟

संभाजीनगर : खरीप हंगामाच्या पेरणीसाठी तसेच शेतीच्या कामासाठी लागणारे पीक कर्ज शेतकऱ्यांना नाकारणाऱ्या बँकांची शिवसैनिक शाळा घेणार असून विधान परिषद विरोधी पक्षनेते तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर शिवसेनेच्या वतीने जिल्ह्याभरातील बँकासमोर आज गुरुवार दि.13 जून रोजी सकाळी 11.00 वाजता जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे. 


राज्यात मान्सूनचा पाऊस चांगल्या प्रकारे झाल्यामुळे खरीप हंगामाच्या पेरणी शेतकरी जोमात करण्यासाठी सज्ज झाला असला तरीही पेरणीसाठी हातात पैसा नसल्याने बहुसंख्य शेतकरी बँकाच्या दारी पीक कर्जासाठी गेला आहे. तसेच मागील वर्षी दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात राखीव पैसाही नाही. यामुळे शेतकऱ्यांना बँकाकडून कर्ज घेण्याशिवाय गत्यंतर नसल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी बँकाकडे कर्जासाठी अर्ज केला आहे. परंतु बँक शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याच्या तसेच मंजुरीसाठी टक्केवारी मागत असल्याच्या अनेक तक्रारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात आल्या आहे. 

या तक्रारीची सत्य परिस्थिती समोर यावी तसेच मागील काही दिवसांपूर्वी जिल्हा लीड बँकेच्या बैठकी दरम्यान 8 जून पर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील पीक कर्ज प्रकरणे शून्य टक्क्या पर्यंत आणण्यासाठी केलेल्या सुचनेवर बँकानी काय कार्यवाही केली, याची माहिती होण्यासाठीही या आंदोलनाची रूपरेषा आखाण्यात आली आहे.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या