🌟परभणीत ‘आरोग्य तपासणी ते उपचार’ योजनेचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रारंभ....!


🌟यावेळी सरकारी कामगार अधिकारी यांच्या कार्यालयातील कर्मचारी व आरोग्य तपासणी करणारे कर्मचाऱ्यांची उपस्थिती🌟

परभणी (दि.24 जुन 2024) : सरकारी कामगार कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नियुक्त कंपनीमार्फत जिल्ह्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगारांसाठी ‘आरोग्य तपासणी ते उपचार’ या योजनेचा प्रारंभ जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला.

यावेळी सरकारी कामगार अधिकारी यांच्या कार्यालयातील कर्मचारी व आरोग्य तपासणी करणारे कर्मचारी यांची उपस्थिती कार्यक्रमास होती. परभणी जिल्ह्यासाठी अत्याधुनिक जीवन समर्थन प्रणालीयुक्त फिरते वैद्यकीय कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी श्री. गावडे यांच्या हस्ते ‘फिरते वैद्यकीय कक्षा’च्या वाहनास हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.

या योजने अंतर्गत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबातील पती अथवा पत्नी व १० वर्षावरील प्रथम दोन अपत्ये लाभार्थी म्हणून राहतील. बांधकाम कामगार हा नोंदणी कालावधीमध्ये वर्षातून एकदा योजनेच्या लाभासाठी पात्र राहील. नोंदीत बांधकाम कामगारांची प्राथमिक आरोग्य तपासणी चाचणी केल्यानंतर कामगारास जीवितास धोका निर्माण करणारा आजार असेल तर त्या आजारावर आवश्यक ते ‘आरोग्य तपासणी उपचार’ या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहेत....... 

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या