🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟माझा आणि देवेंद्रजींचा एकत्र लिफ्ट प्रवास हा योगायोगच ; विधिमंडळातील भेटीवर उद्धव ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण🌟

* पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या भेटीगाठी, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या दालनात चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंची भेट तर विधानभवनाच्या लिफ्टमधून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा एकत्र प्रवास ; विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना चंद्रकांत पाटीलांनी दिले मोठ्ठे  कॅडबरी चाॉकलेट ; उद्धव ठाकरेंच्या अचानक भेटीने चंद्रकांतदादा पाटील  अवाक, चंद्रकांत पाटीलांनी लवकरच होणाऱ्या विधानपरिषदेवर निवडीबद्दल अनिल परबांचे देखील केले ॲडव्हान्समध्ये अभिनंदन 

* उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटलांना म्हणाले बसा गप्पा मारु ; तर उद्धव ठाकरे अन् फडणवीसांच्या लिफ्ट प्रवासावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली प्रतिक्रिया तुम्हा दोघांना एकत्र पाहून बरं वाटतं असे म्हणाले 

* माझा आणि देवेंद्रजींचा एकत्र लिफ्ट प्रवास हा योगायोगच ; विधिमंडळातील भेटीवर उद्धव ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण ; उद्धव ठाकरेंची लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचणार नाही, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या लिफ्टमधील भेटीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला 

* अजित पवार गटाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस पक्षनेतृत्वाची मान्यता घेऊनच बोलण्याची ताकीद ; अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा आमदार राहुल कुल यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी भडास काढली

* खासदार बनलेल्या महाराष्ट्रातील 8 आमदारांचे राजीनामे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सभागृहात नावं वाचून दाखवली! ;भाजप विधानसभा निवडणुकीपूर्वी डाव साधणार, राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी हालचाली 

* उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा; संजय राऊत यांची अप्रत्यक्ष मागणी ;''पदापेक्षा विचारांसाठी लढायला हवे''; मुख्यमंत्रिपदावरुन आ. रोहित पवारांचा संजय राऊतांवर पलटवार 

* नीट पेरफुटीचं रॅकेट लातूरपर्यंत मर्यादित नाही,जिल्ह्याजिल्ह्यात पसरलंय सबएजंट्सचं जाळं; दोन आरोपी शिक्षकांची कबुली ; नवी मुंबईत नीट परीक्षेला बसला डमी विद्यार्थी; प्रकरण CBI कडे वर्ग  

* अहमदनगर आयुक्तांवर 8 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई, ACB च्या कारवाईनंतर आयुक्त पंकज जावळे फरार 

* मी आयुष्यात पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला ; शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची ऑडिओ क्लिप व्हायरल बीडमध्ये उडाली खळबळ

* पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, महादेव जानकर या लोकसभेमध्ये पराभुत झालेल्या उमेदवारांची  विधानपरिषदेवर निवड होणार ; भाजपातर्फे लवकरच या सर्वांच्या नावाची घोषणा होणार 

* अजित पवारांच्या काही आमदारांनी घेतली जयंत पाटील यांची भेट, अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा 

* पुण्याला धडकी भरवणारा झिका व्हायरसचा  मुंढव्यात सापडला तिसरा रुग्ण, पुणेकारांनो डासांपासून सावध राहा  प्रशासनाच्या सुचना                            

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या