🌟परभणी जिल्ह्यातील विद्युत कर्मचारी व अभियंत्यांचा बेमुदत संपावर जाण्याचा इशारा....!


🌟वेतन वाढीच्या प्रश्‍नावर तातडीने चर्चा सुरु करुन निर्णय घेण्याची मागणी🌟

परभणी (दि.२४ जुन २०२४) : ०१ एप्रिल २०२३ पासून वीज कामगार,अधिकारी व अभियंता यांना देय असणार्‍या वेतन वाढीच्या प्रश्‍नावर तातडीने चर्चा सुरु करुन निर्णय घ्यावा या मागणीसाठी राज्य विद्युत कर्मचारी,अभियंते व अधिकारी कृती समितीने ०९ जूलै २०२४ पासून बेमुदत संपाचा निर्णय जाहीर केला आहे.

                राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री यांच्या बरोबर झालेल्या बैठकीतून या प्रश्‍नावर चर्चा करण्यात आली परंतु चर्चा अंतीम निर्णयाप्रत आली नाही उर्जा मंत्र्यांद्वारे अंतीम निर्णया संदर्भात बैठकीद्वारे निर्णय घेतला जाईल असे अपेक्षित होते. परंतु, निवडणूकीची आचारसंहिता संपूनसुध्दा अद्यापपर्यंत निर्णय झाला नाही, अशी खंत व्यक्त करीत या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी २४ जुन रोजी विभागीय कार्यालय वीज निर्मिती केंद्र व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी द्वार सभांपाठोपाठ २८ जुन रोजी परिमंडळ व पावर स्टेशन येथील द्वार सभा व ०९ जूलै रोजी एक दिवसाचा लाक्षणीक संप व त्याही दिवशी निर्णय न झाल्यास त्याच दिवसांपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या