🌟मानोरा तहसिल कार्यालय येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल नागपूर तर्फे प्रशिक्षण संपन्न.....!


🌟प्रशिक्षणातून जागृती : आग लागली,पूर आला,वीज पडली घाबरू नका धैर्याने मिळवा नियंत्रण मिळवण्याचा एसडीएम देवरे यांचा संदेश 

(वाशिम जिल्ह्यातील मानोरा तहसील कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांना एनडीआरएफने दिले धडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचा पुढाकार)


फुलचंद भगत

वाशिम:पूर, वीज, आग, रस्ते अपघात, सर्पदंश या आपत्तीवर नियंत्रणाबाबत मार्गदर्शनासाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन मानोरा येथे करण्यात आले होते. आपत्तीत न घाबरता त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे, या संदर्भात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), नागपूर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिकातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, वाशिम, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, नागपूर व तहसील कार्यालय, मानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने साेमवार २५ जून रोजी हा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे हे या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी तहसीलदार संतोष येवलिकर , तालुका आरोग्य अधिकारी डॉ सापे, पोलीस निरीक्षक शिंदे,नायब तहसीलदार अस्टूरे, संदिप आडे यांची प्रमुख उपस्थिती होती, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, एनडीआरएफ नागपूरचे पोलीस निरीक्षक ब्रिजेशकुमार यादव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयस्वाल व एनडीआरएफची चमू उपस्थित होती. शाहू भगत, तहसीलदार ब्रिजेश कुमार यादव, बि.के.जयस्वाल व एनडीआरएफच्या चमुने उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मार्गदर्शन उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांनी केले. प्रशिक्षणाला सरपंच, पोलीस पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व विविध विभागाचे कर्मचारी, तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. यशस्वितेसाठी अजय खिराडे, शिरसाट ,कोतवाल व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल डुकरे यांनी केले.

जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणच्या अध्यक्ष बुवनेश्वरी एस.यांच्या आदेशानुसार व निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणचे मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वनाथ घुगे यांच्या सूचनेनुसार हे प्रशिक्षण घेण्यात आले.    

* या संदर्भात मार्गदर्शन व प्रशिक्षण :

१) मोठ्या व्यक्तीला व लहान मुलांना सीपीआर कसा द्यायचा.

२) पूर परिस्थितीत नागरिकांना कसे सुरक्षित स्थळी पोहचायचे. प्राण कसे वाचवायचे.

३) सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार कसे करावे. विषारी, निम विषारी, बिन विषारी साप कसा ओळखावा. लोकांचे प्राण कसे वाचवावे. सापाचे प्रकार किती आहे.

४) रस्ते अपघात झाल्यास लोकांचे प्राण कसे वाचवावे. प्रथमोचार कसे करावे.

५) अग्निशमन यंत्र कसे हाताळावे. आग लागल्यास ती कशी विझवावी. घरगुती गॅस कसा हाताळावा.

६) विजे पासून नागरिकांनी स्वतःचे प्राण कसे वाचवावे.

याबाबत विस्तृत मार्गदर्शन एनडीआरएफच्या चमुने केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या