🌟परभणीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्याचा केला आनंदोत्सव साजरा....!


🌟यावेळी माजी नगराध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟

 परभणी (दि.१० जुन २०२४) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसर्‍यांदा शपथ घेवून हॅट्रीक साधल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी आज सोमवार दि.१० जुन २०२४ रोजी परभणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंदोत्सव साजरा केला.

            माजी नगराध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल, दिनेश नरवाडकर, सुप्रिया कुलकर्णी, ऋतूजा जोशी, सुनील कुलकर्णी, विजय गायकवाड, रामदास पवार, संजय रिझवानी, प्रियंका खडके, किसनसिंग टाक, पुनम शर्मा, छोटे मियाँ, अनंता गिरी, अक्षय टाक, अतूल बर्गे, माऊली कोपरे, उमेश शेळके, शुभम वायवळ यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते या आनंदोत्सवात सहभागी होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत संपूर्ण परिसर दणाणून सोडला व नागरीकांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या