🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.......!


🌟परळीत गोळीबार : मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा गोळीबारात मृत्यू🌟

 ✍️ मोहन चौकेकर

* भारत ठरला विश्वविजेता भारताने जिंकला टी 20 चा वर्ल्डकप, भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन जिंकला टी 20 चा वर्ल्डकप, भारताने 17 वर्षानंतर जिंकला टी 20 चा वर्ल्डकप, विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधुन घेतला संन्यास.

* विधीमंडळात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरुन घमासान..निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजनेची घोषणा, विरोधकांचा आरोप तर लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक हक्कभंग आणण्याच्या तयारीत.

* महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा...मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं स्पष्टीकरण.

* अधिवेशनात नीटच्या मुद्द्यावरून अधिवेशनात विरोधक आक्रमक...नीट पेपर फुटी प्रकरणी राज्यात स्वतंत्र कायदा करण्याची मागणी...तर अर्थसंकल्पातील योजनांवरून सरकारविरोधात घोषणाबाजी

* राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय. तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी नियमावली ठरवू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. 

* विधानसभेलाही लोकसभेसारखेच निकाल लागतील शरद पवारांना विश्वास : काँग्रेसमुक्तीची घोषणा देणाऱ्या मोदींनी भाजपच्या जागा किती घटल्या बघावं असा सल्ला.

* शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंची पक्षातून हकालपट्टी..कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी तीन दिवस पोलीस कोठडी.

* वायकरांचे मेहुणे मंगेश पंडीलकरकडं होतं अपक्ष उमेदवाराच्या पोलिंग एजंटचं आयडी कार्ड,पंडीलकरनं दोन उमेदवारांचं ओळखपत्र वापरल्याचा शाह यांचा आरोप.

* नीट पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढली...लातूरसोबत बीडचंही कनेक्शन...आरोपींकडे सापडलेल्या १४ एडमिट कार्ड पैकी ७ कार्ड बीडच्या विद्यार्थ्यांचे असल्याचं समोर.

* नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर पालिकेचा हातोडा.. अतिक्रमण विभागाकडून वसंत गितेंचे संपर्क कार्यालयावर कारवाई..प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना कारवाई करत असल्याचा गीतेंचा आरोप.

* अरविंद केजरीवालांना पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल अटकेत.

* गंगानदीची पाणीपातळी वाढल्याने उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये पूरस्थिती..अनेकांची घरं पाण्यात, तर गाड्याही गेल्या वाहून

* संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान, तर तुकोबांच्या पालखीचा आज आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पहिला मुक्काम.

* आळंदीत माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हजेरी.. वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी धरला फुगडीचा फेरा.

* महायुती म्हणूनच आगामी निवडणुकांना सामोरं जायचं, भाजप कोअर कमिटी बैठकीत विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरला, खोट्या नरेटीव्हला काऊंटर करण्यासाठी काही नेत्यांची नियुक्ती करणार. 

* महाराष्ट्र भाजपाची दोन दिवस पुण्यात बैठक, केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता, १३ जुलैला प्रदेश पदाधिकारी, १४ जुलैला विस्तारित कार्यसमितीची बैठक. 

* माजी आमदार वसंत गिते यांच्या मुंबई नाका परिसरातील संपर्क कार्यालयावर मनपाची कारवाई, मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कारवाई कशी होते,प्रथमेश गितेंचा सवाल. 

* महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कालावधीत अभ्यागतांना फक्त मंगळवार आणि गुरुवारी मर्यादित संख्येने प्रवेश मिळणार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा.

* निकालही लोकसभेसारखे दिसतील, मोदींनी १८ सभा घेतल्या, १४ जागी पराभव झाला, जिथे जिथे मोदींच्या सभा झाल्या तिथे तिथे मविआचा विजय, शरद पवरांचा हल्लाबोल. 

* गणेश मूर्तिकारांना मोफत मध्ये शाडू माती उपलब्ध करुन देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा. 

* साऊथ कोरियाचा हुंदाई प्रकल्प पुण्यात येणार, गेल इंडिया कंपनी महाराष्ट्रात साडे चार हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार,मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती. 

* ३ वर्षात दाओसला कोण कोण गेलं, त्यांनी काय केलं, किती MOU झाले, कितींची अंमलबजावणी झाली याची श्वेतपत्रिका काढणार, उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती. 

* ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु करणार, सर्वधर्मातील ज्येष्ठ नागरिकांचा विचार करुन योजना सुरु करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. 

* राज्य सरकारला तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ, महाराष्ट्राच्या जनतेने सरकारला आपली जागा दाखवली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाल पटोलेंचा सरकारवर निशाणा.

* आगामी निवडणुकांना महायुती म्हणूनच सामोरं जायचं, भाजप प्रभारींचे कोअर कमिटी सदस्यांना निर्देश..तर बैठकीत विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरला.

* फोटोग्राफीमध्ये आवड असणारी व्यक्ती मुख्यमंत्री झाली की खूप प्रॉब्लेम होतो...देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका.

* २०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा पैशाच्या देवाणघेवाणीशिवाय होऊच शकत नाही, पुण्यातल्या पोर्शे प्रकरणावरुन राज ठाकरेंचं टीकास्त्र, अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनात राज ठाकरेंची मुलाखत.

* विधीमंडळात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरुन घमासान..निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजनेची घोषणा, विरोधकांचा आरोप तर लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक हक्कभंग आणण्याच्या तयारीत

* भविष्यात वैद्यकीय प्रवेश परीक्षा राज्यांमार्फत घेण्याचा विचार होऊ शकतो, अजित पवारांचे संकेत...कडक कायदा करण्याची विरोधकांची मागणी.

* नीट पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढली...लातूरसोबत बीडचंही कनेक्शन...आरोपींकडे सापडलेल्या १४ एडमिट कार्ड पैकी ७ कार्ड बीडच्या विद्यार्थ्यांचे असल्याचं समोर.

* संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान तर तुकोबांच्या पालखीचा आज आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पहिला मुक्काम.

* आळंदीत माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हजेरी.. वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांचा फुगडीचा फेरा, रथांचं केलं सारथ्य...

* परळीत गोळीबार : मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा गोळीबारात मृत्यू.

* पुणे  कार अपघातातील आरोपीला निबंध लिहण्याची दिलेली शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही राज ठाकरे यांचे मत.

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या