🌟परभणी येथील सुभाष रोड परिसरात मराठा सेवा मंडळाच्या वतीने ३५१ वा शिवराज्यभिषेक दिन साजरा.....!


🌟यावेळी मराठा सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष नितीन देशमुख यांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले🌟 

परभणी (दि.०६ जुन २०२४) : परभणी शहरातील सुभाष रोड परिसरात मराठा सेवा मंडळाच्या वतीने आज गुरुवार दि.०६ जुन २०२४ रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५१ वा शिवराज्यभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

             यावेळी मराठा सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष नितीन देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत छत्रपती शिवरायांचा जयजयकार करण्यात आला. यावेळी देशमुख यांनी शिवराज्यभिषेक दिन घराघरात साजरा करण्याचे आवाहन  केले. मराठा सेवा मंडळ शहर जिल्हाध्यक्ष गोविंद इक्कर पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत शिवराज्यभिषेक दिन का साजरा करावा? याबद्दल माहिती दिली तर जिल्हाप्रमुख मंगेश भरकड यांनी सर्व शिवप्रेमींना शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा दिल्या.

              यावेळी मराठा सेवा मंडळ तालुकाध्यक्ष अंगद मस्के, कारभारी जाधव, रवि यन्नावार, शुभम जाधव, शिवाजी माने, पिंटू जाधव, संतोष माने, अमोल आबिलबादे, डिगांबर सावंत, बहिरट, अशोकराव कदम पाटील, सतिश औंढेकर, उमेश यरळकर, धर्मराज दलाल, संतोष शहाणे यांच्यासह शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या