🌟आता त्यांची फाटलीय,शिवसेना फोडणाऱ्या नालायकांसोबत परत जाणार नाही : उद्धव ठाकरे


🌟मला विरोध म्हणून काहींनी 'बिनशर्ट' पाठिंबा दिला राज ठाकरे यांच्यावर ही उध्दव ठाकरेंची टीका🌟 

मुंबई : निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे  आता भाजसोबत चर्चा करत असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या, पण ज्यांनी आपल्या मातेसमान शिवसेना फोडली त्यांच्यासोबत जायचं का? आता त्यांची फाटलीय म्हणून या चर्चा सुरू केल्या असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह सोडून माझ्यासमोर या, मग सांगतो यांना असं आव्हानही त्यांनी एकनाथ शिंदे यांनी लगावला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 

जमलेल्या माझ्या लढावाय्या शिवसैनिकांनो! लोकसभा निवडणुकीच्या निकलानंतर पहिला आपला जाहीर कार्यक्रम आहे. शिवसेना म्हटल्यावर नवं चैतन्य आणि तरुणाई आली पाहिजे. मविआची पत्रकार परिषद झाली, त्यावेळी मी धन्यवाद दिले आहे.पण पुन्हा एकदा शिवसेनेच्यावतीने सर्व हिंदू मुस्लिम शीख बौद्ध या सगळ्या धर्मांचे साथ दिल्याबद्दल  आभार मानतो. 

गेल्या आठवड्यात मविआची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी मी सर्वांना धन्यवाद दिले. पण मी आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने सर्व देशभक्त ज्यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, दलित या सर्वांना, मविआला मतदान करणाऱ्या सर्व देशभक्तांना मी धन्यवाद देतो. 

मी शून्य आहे, यशाचे धनी तुम्ही आहात. आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठे जा तुम्हालाला कोणी रोखू शकत नाही. पण आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये फरक आहे. अहंकार जो पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये आहे. आता पुन्हा एकदा चर्चा करतात उद्धव ठाकरे मोदींसोबत जाणार.  ज्यांनी शिवसेना फोडली, मातेसमान शिवसेनेला फोडलं त्या नालायकांसोबत परत जायचं? आता त्यांची फाटलीये.

* संजय राऊतांचं घणाघाती भाषण :-

त्याआधी खासदार संजय राऊत यांनी तुफान भाषण केलं. मोदी हा ब्रँड होता आता ब्रँडी झाली आहे बहुतेक, ही आता देशी ब्रँडी झाली आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. 

संजय राऊत म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक आहे, फिनिक्स पक्षासारखी राखेतून भरारी आपण मारली. हा शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे, तुमच्या सारख्या फडतूस माणसा समोर आम्ही झुकणार नाही.  मोदी जन्माला आल्यावर चारशे खुळखुळे घेऊन जन्माला आले होते. 400 पार हा जन्मसिद्ध अधिकार आहे असं वागत होते.  मोदींचा खुळखुळा जर कोणी केला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी केला आहे.  

तिकडे डोममध्ये (वरळी डोम) डोम कावळे जमलेत. कावळ्यांचं संमेलन किती भरले आहे. आमचा 58 वा वाढदिवस सुरू आहे ते अडीच आहेत. असंख्य हुतात्माच्या बलिदानeतून शिवसेना स्थापन केली. हे गुजरातचे सोमे गोमे आले. 

महाराष्ट्राचा वारसा उद्धव ठाकरे यांनी चालवला आणि यश मिळवलं. भाजप आता आभार यात्रा धन्यवाद यात्रा काढणार आहे. कशाबद्दल? 400 पार करणार होते. तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. अरे तुम्ही हरलाय. आणि आभार यात्रा काय काढताय? मोदी हा ब्रँड होता आता ब्रांडी झाली आहे बहुतेक, ही आता देशी ब्रांडी झाली आहे

* मला विरोध म्हणून काहींनी 'बिनशर्ट' पाठिंबा दिला :-

उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज ठाकरे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, मला विरोध करण्यासाठी काही जणांनी उघड म्हणजे 'बिनशर्ट' पाठिंबा दिला. 

* काय म्हणाले उद्धव ठाकरे ? 

मिंधे आणि भाजपला सांगतो तुम्ही जर षंड नसाल तर तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न लावता, धनुष्यबाण चिन्ह न घेता आणि शिवसेना नाव न लावता निवडणूक लढा. माझ्या वडिलांचा फोटो वापरता आणि मला स्ट्राइक रेट सांगतात. मिंधेंच्या वडिलांचा फोटो लावा आणि निवडणूक लढवा.

तुम्ही जर पाठीत वार कराल तर आम्ही वाघनख काढू. मुनगंटीवार यांचे नख चंद्रपूरमध्ये  उखाडले आणि तुम्ही शिवाजी महाराजांचे वाघनखं आणताय ?

तुम्ही देशाच्या मंत्र्यांना पक्षाचं काम दिलं तर देशाचा काम कोण करणार

पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणारे आता काय म्हणताय ? जाऊद्या ना घरी. आता वाजले की बारा, आता एवढे बारा वाजवले.

11 विधानपरिषद जागाच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे जर अपात्र आमदारांची सुनावणी सर्वोच्च न्यायालय सुरू आहे, तर मग तुम्ही ही निवडणूक तुम्ही घेणार कशी ?

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधी लागणार? तारीख पे तारीख हे काय सनी देओल आहे.

तुमची नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू सोबत झालेली युती अनैसर्गिक नाही का ?

आता 'ओ मांझी रे' करत बसलेत सगळ्यांना सोबत घेऊन तुम्ही हिंदुत्व सांगणार आम्हाला ? माझ्या आजोबांनी वडिलांनी हिंदुत्व शिकवलं आहे

सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्व का सोडल? मोदी...नेशन वॉण्टस टू नो? पूछता है भारत ? आता तुम्हाला पुसूनं टाकलं. 

नड्डा आपल्याला संपवायला निघाले होते...नड्डाजी आता नड्डा संभालके रखो.                                      

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या