🌟राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत एक राज्य एक गणवेश योजना लागू.....!


🌟गणवेशाची रचना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने निश्‍चित केली आहे🌟


परभणी (दि.१२ जुन २०२४) :  समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत सन २०२४/२५ या शैक्षणिक वर्षात शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या नियमित तसेच स्काऊट व गाईड या विषयाच्या गणवेशाची रचना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने निश्‍चित केली आहे.

           इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीतील मुलींकरीता आकाशी रंगाच्या बाह्या असलेल्या गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक तर स्काऊट गाईडसाठी गडद निळ्या रंगाचा ओव्हर ऑल फ्रॉक, इयत्ता पाचवीच्या मुलींसाठी आकाशी रंगाचे शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट, इयत्ता सहावी ते आठवी मुली तसेच इयत्ता पहिली ते आठवी मुली (उर्दू माध्यम) आकाशी निळ्या रंगाची कमीज, निळ्या गडद रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी, इयत्ता पहिली ते सातवी मुलांकरीता आकाशी रंगाचा शर्ट, गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट, तसेच इयत्ता आठवीच्या मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट नियमित गणवेश म्हणून निश्‍चित केला आहे. पहिली ते सातवी मुले व आठवी मुले यांना स्काऊट व गाईडसाठी स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ व फुल पॅन्ट असा गणवेश निश्‍चित करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश तर स्काऊट गाईडचा गणवेश मंगळवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवशी परिधान कराणे अपेक्षित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या