🌟महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निम्मित रूग्णांना फळ वितरण....!


🌟यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते🌟


फुलचंद भगत

वाशिम:-महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्पनेचा वारसा जोपासत रयतेचे राज्य निर्माण करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची "१५० वी जयंती" दिनांक २६ जून २०२४ रोजी वाशिम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांचे मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  कायमच शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जोपासणारा पक्ष आहे. या युगपुरुषांचे सामाजिक सलोखा आणि लोकशाहीवादी विचार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मूळ मंत्र आहे याच विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा १५० वा जन्मोत्सव दिनांक २६ जून २०२४ ते ०१ जुलै २०२४ (कृषि दिन) दरम्यान राज्यभरात साजरा करीत आहे,


त्याअनुषंगाने दिनांक-२६ जून रोजी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद युसूफ पुंजानी यांचे मार्गदर्शनात व उपजिल्हा रुग्णालय कारंजाचे डॉ उदय जाधव व डॉ सागर मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत  स्थानिय उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांना बिस्कीट व फळांचे वितरण करण्यात आले यावेळी नगरसेवक सलीम गारवे,जाकीर शेख,सलीम प्यारेवाले, अ रशीद,शेख युनूस पहेलवान,इरफान खान,चांद मुन्नीवाले, कय्युम जट्टावाले,रज्जाक खेतिवाले,जुनेद बेग,मुजफ्फर शेख,अकिल पहेलवान,रज्जाक फकिरावाले,फहीम टेलर,श्याम घोडेस्वार, तुषार बनसोड,हाफीज राज,उस्मान खान,साजिद शेख,मुजाहिद खान,सदीम नवाज,मोहसीन शेख यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या