🌟पुणे एक्सप्रेस आणि निजामाबाद डेमुच्या मार्गात रेल्वे प्रशासनाने केला बदल.....!


🌟काही रेल्वे गाड्या अंशतः करण्यात आल्या रद्द : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली माहिती🌟


नांदेड (दि.26 जुन 2024) : पुणे विभागातील दौंड ते मनमाड दरम्यान दुहेरीकरणाच्या कामाकरीता पुणतांबा ते कान्हेगाव स्थानकामध्ये नॉन इंटर लॉक आणि इंटर लॉक वर्किंग करण्यात येणार आहे. त्यासाठी काही दिवस लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला असून काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.

             गाडी क्रमांक 11409 दौंड-निजामाबाद ही डेमू रेल्वे 26 ते 30 जून दरम्यान कुर्डुवाडी, लातूर, परळी, परभणी मार्गे तर गाडी क्रमांक 11410 निजामाबाद-पुणे ही डेमू रेल्वे 25 ते 29 जून दरम्यान परभणी, परळी, लातूर, कुर्डूवाडी या बदललेल्या मार्गाने धावणार आहे. तसेच गाडी क्रमांक 17629 पुणे-नांदेड एक्सप्रेस ही रेल्वे 25 ते 29 जून दरम्यान दौंड, कुर्डूवाडी, लातूर, परळी, परभणी मार्गे तर गाडी क्रमांक 17630 नांदेड-पुणे एक्सप्रेस ही रेल्वे 26 ते 30 जून दरम्यान परभणी, परळी, लातूर, कुर्डूवाडी, दौंड या बदललेल्या मार्गाने धावणार आहे.

           दरम्यान, गाडी क्रमांक 17002 सिकंदराबाद-श्रीसाईनगर शिर्डी एक्सप्रेस ही रेल्वे 28 जून रोजी मनमाड ते श्री साईनगर शिर्डी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आल असून ही गाडी सिकंदराबाद ते मनमाड अशी धावेल. तर गाडी क्रमांक 17001 श्री साईनगर शिर्डी-सिकंदराबाद एक्सप्रेस ही रेल्वे 29 जून रोजी श्री साईनगर शिर्डी ते मनमाड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असून ही रेल्वे मनमाड ते सिकंदराबाद अशी धावेल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या